Jump to content

समलिंगी विवाह

समलिंगी विवाह दोन समान लिंगाच्या व्यक्तींदरम्यान कायदेशीर रित्या करण्यात येणारा विवाह आहे. उदा. दोन पुरषांमधील विवाह किंवा दोन स्त्रियांमधील विवाह.

जगातील अनेक देशांमध्ये समलैंगिक समागम करणे हा कायदेशीर गुन्हा नाही; तरी बहुतांश देशांमध्ये समलिंगी विवाहास कायद्याने काही अधिकृत दर्जा दिलेला नाही. समलिंगी विवाहाला सर्वप्रथम २००१ साली नेदरलँड्स देशामध्ये मान्यता दिली गेली. त्यानंतर बेल्जियम, कॅनडा, नॉर्वे, दक्षिण आफ्रिका, स्पेन, स्वीडन, आइसलँड, पोर्तुगालआर्जेन्टिना ह्या ९ अधिक देशांनी, तसेच अमेरिकेच्या कनेटिकट, आयोवा, मेन, मॅसेच्युसेट्सव्हरमाँट ह्या राज्यांनी समलिंगी विवाहांना मान्यता दिलेली आहे.

  समलिंगी विवाह
  परदेशात झालेले समलिंगी विवाह वैध
  इतर प्रकारचे संबंध मान्य
  समलिंगी विवाहांना अधिकृत दर्जा नाही

भारतीय घटनेच्या कलम ३७७ मधील काही कलमांनुसार काही विशिष्ट 'अनैसर्गिक समागम संबंध' - जरी ते प्रौढ व्यक्तींमध्ये 'परस्परसंमतीने आणि खासगीपणे' होत असतील तरीही - गुन्हा म्हणून गणला जात होते. ह्या कलमांनुसार समलैंगिक संबंध (इतकेच नव्हे तर स्त्री-पुरुषांमधील समागमाचे काही प्रकारही) बेकायदेशीर होते. मात्र जुलै २००९ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने एक निर्णयाद्वारे[] हे कलम 'घटनात्मक व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या आड येणारे' म्हणून अवैध घोषित केले.

संदर्भ

  1. ^ "India decriminalises gay sex".