समर्थ संप्रदाय
समर्थसंप्रदाय हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा संप्रदाय. समर्थ रामदास स्वामी यांनी तो शिवकालात स्थापन केला. संत रामदास स्वामींप्रमाणेच या संप्रदायाच्या कवींनी विपुल लेखन केलं आहे. या संप्रदायाची हस्तलिखिते मुख्यत्वेकरून धुळ्याच्या श्रीसमर्थ वाग्देवता मंदिरात उपलब्ध होतात. ती मिळविण्यासाठी समर्थभक्त शंकरराव देव यांनी अपार परिश्रम केले. त्यामुळे हा मौलिक संग्रह आजवर टिकून राहिला.
शिष्यमंडळ
समर्थांनी त्या काळी ११०० मठ स्थापन केले आणि सुमारे १४०० तरुण मुलांना समर्थ संप्रदायाची दीक्षा दिली.त्यांचे काही शिष्य गृहस्थाश्रमी होते, तर काही शिष्य ब्रम्हचारी होते.ज्या वेळी एखाद्या शिष्याची महंतपदी नियुक्ती होत असे त्या वेळी त्या शिष्याची कसून परीक्षा घेतली जाई.समर्थांना शिष्याकडून कठोर साधनेची आणि अभ्यासाची अपेक्षा होती.दासबोधाचे नुसते पारायण करून भागात नव्हते, दासबोध समजावून घेण्यावर समर्थांचा भर होता.अनेक महंतांचा दासबोध कंठस्थ होता.शिष्याची परीक्षा घेण्याची समर्थांची पद्धत मोठी विलक्षण होती.त्यावेळी ग्रंथ छापले जात नसत.हाताने लिहून ग्रंथांचा नकला केल्या जात.छापी नसल्यामुळे ग्रंथ बांधलेले ( बाईन्डींग ) नसत.पानांवर पृष्ठांक देखील नसायचे.अशा वेळी समर्थ त्या शिष्याकडून त्याने लिहिलेली दासबोधाची पोथी मागवून घेत.पत्त्याप्रमाणे पिसून पोथीची सर्व पाने विस्कळीत करत आणि मग शिष्याला सगळा दासबोध पुन्हा व्यवस्थित लावून ठेवायला सांगत.ज्या शिष्यांचा दासबोध कंठस्थ नसे त्यांना पोथी जुळवायला फार वेळ लागे.अशा शिष्याला महंत म्हणून किंवा मठपती पदी नियुक्त केले जात नसे.ज्याला पोथी लावायला विलंब झाला त्यांची निर्भत्सना करताना समर्थ म्हणत," याने दासबोध वाचला नाही केवळ गंधफुले वाहून पुजला."त्या वेळी समर्थांचे शिष्यांना सांगणे होते की, जो कोणी दासबोध ग्रंथाचे वाचन करील, तो ग्रंथ नीट समजावून घेईल आणि त्यानुसार आचरण करेल, अशा माणसाला मोक्ष मिळेल.त्यासाठी वेगळा गुरू करण्याची गरज नाही.ग्रंथ हेच गुरू होत.
- कल्याण स्वामी
- उद्धव स्वामी
- दत्तात्रय स्वामी
- आचार्य गोपालदास
- भीम स्वामी
- दिनकर स्वामी
- केशव स्वामी
- हणमंत स्वामी
- रघुनाथ स्वामी
- रंगनाथ स्वामी
- भोळाराम
- वेणा बाई
- आक्का बाई
- अंबिकाबाई
- अनंतबुवा मेथवडेकर
- दिवाकर स्वामी
- वासुदेव स्वामी
- गिरिधर स्वामी
- मेरु स्वामी
- अनंत कवी
- भोळाराम स्वामी
विसाव्या शतकातील श्रेष्ठ समर्थ सांप्रदायिक
- श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
- श्री. शंकर श्रीकृष्ण देव
- श्री अनंतदास रामदासी
- श्रीधर स्वामी
- श्री मसुरकर महाराज
- श्री अण्णाबुवा कालगावकर
- प्रा. के. वि. बेलसरे
- नानासाहेब धर्माधिकारी
- मोहनबुवा रामदासी
- ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले