Jump to content

सभासद बखर

सभासद बखर

सभासद बखर ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या इच्छेने कृष्णाजी अनंत सभासद याने लिहिलेली आहे. छत्रपती राजारामांसोबत जिंजीला असताना राजारामांच्या आज्ञेनुसार इ.स. १६९७च्या सुमारास सभासदाने छत्रपती शिवाजी शहाजी भोसले यांच्या चरित्रावर बखर लिहून काढली. या बखरीत छत्रपती शिवाजी महाराजांचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व पराक्रम वर्णन केले आहेत. ही बखर संक्षिप्त स्वरूपात असली तरी ही शिवकाळातील बखर असल्याने तिला महत्त्व आहे. कृष्णाजी अनंत सभासद हा शिवछत्रपतींचा समकालीन होता. त्याने शिवछत्रपतींच्या जीवनातील काही घटना प्रत्यक्ष पाहिल्या होत्या. त्यामुळे 'सभासद बखर' ही इतर कोणत्याही बखरीपेक्षा विश्वसनीय मानली जाते. सभासदाने या बखरीत शिवजन्म, शिवाजी महाराजांची बंगलोर भेट, जुन्नर शहर लूट, राजगड बांधणी, चंद्रराव मोरे प्रकरण, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटे तोडणे, मिर्झाराजे यांची भेट, शिवछत्रपतींची औरंगजेबाच्या कैदेतून सुटका, सिद्दी जोहरचा वेढा, तानाजी सिंहगड घेतो, शहाजी महाराजांचा मृत्यू, राज्याभिषेक, दक्षिण विजय, शिवाजी-संभाजी मतभेद, शिवछत्रपतींचा मृत्यू यासारखे प्रसंग मोजक्या आणि नेमक्या शब्दांत लिहिलेले आहेत.

सभासद बखरीमध्ये छञपती शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख सभासदाने नोंदवलेली नाही. या बखरीमध्ये शिवचरित्र संबंधीच्या घटनांच्या केवळ दोन तारखा मिळतात. त्या घटना म्हणजे एक त्यांचा राज्याभिषेक आणि दुसरी त्यांचा मृत्यू.

सभासद बखरीमध्ये शिवरायांच्या जीवनातील काही घटनांची अतिरंजित वर्णने केलेली आहेत. शिवरायांच्या मृत्यूच्या घटनेचे वर्णनही असेच अतिरंजित आहे.[]

शिवराज्याभिषेकाच्यावेळी शिवरायांनी राज्याभिषेकावर केलेल्या खर्चाचा उल्लेख कृष्णाजी अनंत सभासद याने या बखरीमध्ये केलेला आहे त्याबद्दलही आक्षेप घेतला जातो.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "इतिहासाचा वाटाड्या". लोकसत्ता. १३ एप्रिल २००३. 2003-09-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ जानेवारी २०१४ रोजी पाहिले.
  2. ^ सुरज महाजन (२८ ऑगस्ट २०१२). "गागाभट्ट : आक्षेप व खंडण". ऐसी अक्षरे. १२ जानेवारी २०१४ रोजी पाहिले.