सफाळे
सफाळे महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील गाव आहे. येथील कोरे वर्तक पुळण आणि एडवण आशापुरी मंदिर ही पर्यटनस्थळे आहेत. सफाळे रेल्वे स्थानक मुंबई-वडोदरा रेल्वेमार्गावरील एक स्थानक असून येथे फक्त कमी वेगाच्या गाड्या थांबतात.
- सफाळे हे मध्यवर्ती ठिकाण असून पूर्व आणि पश्चिम या दोन्ही ठिकाणी वसलेल्या गावांसाठी ते एक बाजरपेठ म्हणून सोयीस्कर आहे.
एकूणच सांस्कृतिकदृष्टया महत्त्वाचे शहर म्हणून उदयास येत आहे. महत्त्वाचे म्हणजे येथे अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे अंतरंग सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठान सफाळे ही एक महत्त्वाची सेवाभावी सामाजिक संस्था कार्यरत असून विविध उपक्रम आयोजित करीत असते.
अंतरंग[१] ही नॉन-प्रॉफिट संस्था साहीत्य, कला, संस्कृती व पर्यावरण जोपासानेतून सुदृढ समाजाचे निर्माण करणाचे कार्य २०१४ पासून करते आहे. आतापर्यंत साहित्य, संगीत, कला, शिल्प, अभिनय, संस्कृती, पर्यावरण, शैक्षणिक व सामाजिक इत्यादी सर्वच क्षेत्रात संस्थेचे कार्य अप्रतिम आहे. दर वर्षी दिवाळीच्या आधी होणारा "इंद्रधनू कला महोत्सव" हा या संस्थेचा महत्त्वाचा कार्यक्रम असून, वर्षातून ६ वेळा विविध विषयांतील तज्ञ, अभ्यासक, समाजसेवक, इतिहासकार, संगीतकार इत्यादी पैकी मान्यवरांना बोलावून त्यांच्यासोबत "मुक्तसंवाद" ह्या सदराखाली संवाद साधला जातो. ह्या व्यतिरिक्त वर्षभरात विविध उपक्रमांतर्गत संगीत मैफिल, कवी कट्टा, ढोलताशे संचालन, उन्हाळी शिबीर, व्याख्यान, माहितीपट, अभ्यास सहल, इत्यादी कार्यक्रम होत असतात. अंतरंग प्रतिष्ठान तर्फे सफाळे येथे विनामूल्य ग्रंथालय व अभ्यासिका सुद्धा सुरू केलेली आहे.
सफाळे
?सफाळे महाराष्ट्र • भारत | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | पालघर |
लोकसंख्या | १६,२८९ (२०११) |
भाषा | मराठी |
सरपंच | अमोध जाधव |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ४०११०२ • +०२५२५ • एमएच४८ |
संकेतस्थळ: goo.gl/maps/qzV5jFzuJMH2 |
येथून ६० कि.मि. अंतरावर डहाणू येथे औष्णिक विद्युत केन्द्र तसेच ३० कि. मि. अंतरावर तारापूर येथे परमाणु विद्युत केन्द्रे आहेत.
संदर्भ
१.https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२.http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc
३. http://antarang.org/ Archived 2019-04-22 at the Wayback Machine.
- ^ "संग्रहित प्रत". 2019-04-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-04-24 रोजी पाहिले.