Jump to content

सप्‍तरंगी

सप्‍तरंगी

" | शास्त्रीय वर्गीकरण
वंश: वनस्पती
जात: सपुष्प वनस्पती
पोटजात: द्विबीज पत्री
कुळ: सॅलॅस्ट्रसि
जातकुळी: सॅलॅसिया
जीव: चायनेन्सिस

सप्तरंगी (इंग्रजी:Salacia chinensis) ही भारतात, प्रामुख्याने पश्‍चिम घाटात सापडणारी व मधुमेहावर औषध म्हणून वापरली जाणारी एक वनस्पती आहे. ही वनस्पती तुलनेने कमी पाऊस पडणाऱ्या भागांतही तग धरते, असे आढळले आहे.

सप्तरंगी ही महाराष्ट्राच्या काही भागांत इंगळी किंवा निसूल या नावानेही ओळखली जाते. हिचे शास्त्रीय नाव सॅलॅसिया चायनेन्सिस (Salacia chinensis) असे आहे.

संशोधकांना सप्तरंगीच्या मुळांबरोबरच खोड आणि पाना-बियांतही औषधी गुणधर्म सापडल्याने औषध निर्मितीच्या दृष्टीने सप्तरंगीचे उत्पादन महत्त्वाचे ठरले आहे[] . यासंबंधी पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या जैवविविधता विभागातील डॉ. अंकुर पटवर्धन, मकरंद पिंपुटकर आणि राधिका जोशी या संशोधकांचे सप्तरंगी वनस्पतीतील मधुमेहावर नियंत्रण ठेवणाऱ्या गुणधर्मावरील संशोधन बायोडायव्हर्सिटी बायोस्पेक्‍टिंग ॲन्ड डेव्हलपमेंट या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे[].

  1. ^ a b "सप्तरंगी वनस्पती संपूर्ण औषधी". १५ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.