सप्टेंबर ३०
साचा:सप्टेंबर२०२४
सप्टेंबर ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७३ वा किंवा लीप वर्षात २७४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
एकोणिसावे शतक
- १८९५ - मादागास्कर फ्रांसच्या आधिपत्याखाली.
विसावे शतक
- १९३५ - हूवर डॅम बांधून पूर्ण.
- १९३५ - लीग ऑफ नेशन्सने मुद्दामहून नागरिकी वस्तीवर बॉम्बफेक करणे बेकायदा ठरवले.
- १९४७ - पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- १९५४ - यु.एस.एस. नॉटिलस या जगातील अणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.
- १९६५ - इंडोनेशियात कम्युनिस्ट पार्टीने केलेल्या उठावाचा वचपा म्हणून जनरल सुहार्तोने कम्युनिस्ट किंवा कम्युनिस्ट असल्याची कुणकुण लागलेल्या १०,००,००० लोकांची कत्तल करण्यास सुरुवात केली.
- १९६६ - बोत्स्वानाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९८० - झेरॉक्स कॉर्पोरेशन, इंटेल आणि डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशनने इथरनेटचे स्पेसिफिकेशन्स[मराठी शब्द सुचवा] जाहीर केले.
- १९९१ - हैतीत राष्ट्राध्यक्ष ज्याँ-बर्ट्रांड अरिस्टिडची उचलबांगडी.
- १९९३ - लातूर, किल्लारी भागात तीव्र भूकंप हजारो मृत्युमुखी, लाखो बेघर.
एकविसावे शतक
- २००५ - स्पेनचा एक भाग असलेल्या कॅटेलोनिया प्रांताच्या संसदेने १२०-१५ बहुमताने कॅटेलोनिया एक राष्ट्र आहे असे जाहीर केले.
- २००५ - डेन्मार्कमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या यिलँड्स-पोस्टेन या वर्तमानपत्रात मोहम्मद पैगंबरांची वादग्रस्त चित्रे प्रसिद्ध झाली.
- २००६ - सर्बियाने नवीन संविधान अंगिकारले.
जन्म
- १९३३ - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार.
- १९३९ - ज्याँ-मरी लेह्न, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ.
- १९४३ - योहान डायझेनहॉफर, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १९४५ - एहूद ओल्मर्ट, इस्रायलचा बारावा पंतप्रधान.
- १९४६ - पॉल शीहान, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९६२ - शान, भारतीय संगीतकार.
- १९७२ - अरी बेह्न, नॉर्वेजियन लेखक.
- १९८० - मार्टिना हिंगीस, स्वित्झर्लंडची टेनिस खेळाडू.
मृत्यू
- १२४६ - यारोस्लाव्ह दुसरा, रशियाचा झार.
- १९१३ - रुडॉल्फ डीझेल, जर्मन संशोधक.
- १९९२ - गंगाधर देवराव खानोलकर, मराठी लेखक.
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन - बोत्स्वाना.
- शेती राष्ट्रीयीकरण दिन - साओ टोमे आणि प्रिन्सिप.
- आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर ३० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर २८ - सप्टेंबर २९ - सप्टेंबर ३० - ऑक्टोबर १ - ऑक्टोबर २ - सप्टेंबर महिना