सप्टेंबर २७
ऑगस्ट – सप्टेंबर – ऑक्टोबर | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
२७ | २८ | २९ | ३० | ३१ | १ | २ |
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
इ.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
सप्टेंबर २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७० वा किंवा लीप वर्षात २७१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सोळावे शतक
- १५४० - पोप पॉल तिसऱ्याने सोसायटी ऑफ जीझसला (जेसुइट्स) मान्यता दिली.
- १५९० - अवघे १३ दिवस सत्तेवर राहिल्यावर पोप अर्बन सातव्याचा मृत्यू.
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
- १८२१ - मेक्सिकोला स्पेनपासून स्वातंत्र्य.
- १८२५ - द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.
- १८५४ - एस.एस. आर्क्टिकला अटलांटिक महासागरात जलसमाधी. ३०० मृत्युमुखी.
विसावे शतक
- १९०५ - ऍनालेन डेर फिजिकमध्ये अल्बर्ट आइनस्टाइनचा एखाद्या वस्तूचे जडत्व त्यातील उर्जाप्रमाणावर अवलंबून असते का? हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला. यात आइन्स्टाईनने E=mc2 हे समीकरण पहिल्यांदा मांडले.
- १९२२ - ग्रीसच्या राज कॉन्स्टन्टाईन पहिल्याने पदत्याग केला. त्याचा मुलगा जॉर्ज दुसरा सत्तेवर.
- १९४० - जर्मनी, इटली व जपानने होन्शू बेटावरील टायफूनमध्ये ५,००० ठार.
- १९५९ - जपानच्या त्रिपक्षी तह स्वीकारला.
- १९९६ - अफगाणिस्तानमध्ये तालिबानने काबूल जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुरहानुद्दीन रब्बानीने पळ काढला तर नजीबुल्लाहला रस्त्यात फाशी देण्यात आली.
एकविसावे शतक
- २००२ - पूर्व तिमोरला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- २००२ - मराठीमाती या मराठी संकेतस्थळाची सुरुवात.
जन्म
- १३८९ - कोसिमो दि मेदिची, फ्लोरेन्सचा राजा.
- १६०१ - लुई तेरावा, फ्रांसचा राजा.
- १७२२ - सॅम्युएल ऍडम्स, अमेरिकन क्रांतिकारी.
- १९०७ - भगत सिंग, भारतीय क्रांतिकारी.
- १९४८ - डंकन फ्लेचर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५३ - माता अमृतानंदमयी, भारतीय धर्मगुरू.
- १९५७ - बिल ऍथी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६२ - गॅव्हिन लार्सन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - ग्वेनेथ पाल्ट्रो, अमेरिकन अभिनेत्री.
- १९७४ - पंकज धर्माणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - लक्ष्मीपती बालाजी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - ब्रेन्डन मॅककुलम, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १५५७ - गो-नारा, जपानी सम्राट.
- १५९० - पोप अर्बन सातवा.
- १७०० - पोप इनोसंट बारावा.
- १९१७ - एदगा दगा, फ्रेंच चित्रकार.
- १९७२ - एस.आर. रंगनाथन, भारतीय गणितज्ञ.
- १९९६ - नजीबुल्लाह, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
- २००८ - महेंद्र कपूर, विख्यात भारतीय पार्श्वगायक.
प्रतिवार्षिक पालन
- जागतिक प्रवासी दिन.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर २७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर २५ - सप्टेंबर २६ - सप्टेंबर २७ - सप्टेंबर २८ - सप्टेंबर २९ - सप्टेंबर महिना