सप्टेंबर १६
साचा:सप्टेंबर२०२४
सप्टेंबर १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५९ वा किंवा लीप वर्षात २६० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
विसावे शतक
- १९६३ - मलायाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.
- १९२० - न्यू यॉर्कच्या वॉल स्ट्रीट भागातील जे.पी. मॉर्गन इमारतीसमोर घोडागाडीत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट. ३८ ठार, ४०० जखमी.
- १९४१ - दुसरे महायुद्ध-इराणचे शहा रझा पेहलवी, हे नाझी जर्मनीशी संधान बांधत असल्याचा संशय आल्याने युनायटेड किंग्डम आणि सोव्हिएत संघाने इराणवर चाल केली आणि शहाला आपला मुलगा मोहम्मद रझा पेहलवीला सत्तेवर ठेवून पदत्याग करण्यास भाग पाडले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध-हाँग काँगमधील जपानी सैन्याने रॉयल नेव्हीसमोर शरणागती पत्करली.
- १९४७ - जपानच्या तोक्यो, सैतामा आणि तोन नदी भागात टायफून कॅथलीन या चक्रीवादळात १,९३० ठार.
- १९५५ - हुआन पेरॉन आर्जेन्टिनात पदच्युत.
- १९६३ - झेरॉक्स ९१४ या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक.
एकविसावे शतक
- २००७ - वन-टु-गो एरलाइन्स फ्लाइट २६९ हे विमान थायलंडमध्ये कोसळले. १२८ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांपैकी ८९ ठार.
- २००७ - इराकच्या बगदाद शहरात ब्लॅकवॉटर वर्ल्डवाइड या अमेरिकन सैन्याच्या भाडोत्री सैनिकांनी १७ इराकी नागरिकांना निसूर चौकात ठार मारले.
जन्म
- १३८७ - हेन्री पाचवा, इंग्लंडचा राजा.
- १५०७ - ज्याजिंग, चिनी सम्राट.
- १७८२ - दाओग्वांग, चिनी सम्राट.
- १८५३ - आल्ब्रेख्त कॉसेल, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन डॉक्टर.
- १८५८ - अॅन्ड्र्यू बोनार लॉ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८७५ - जेम्स सी. पेनी, अमेरिकन उद्योगपती.
- १९१३ - कमलाबाई ओगले, मराठी पाककृती रुचिराच्या लेखिका
- १९१६ - एम.एस. सुब्बलक्ष्मी, कर्नाटक शैलीतील गायिका.
- १९२५ - चार्ल्स हॉई, आयर्लंडचे पंतप्रधान.
- १९३१ - जॉर्ज सुदर्शन, पद्मविभूषण पुरस्कारविजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
- १९४२ - ना. धों. महानोर, निसर्ग कवी, शेतकरी, आमदार.
- १९८३ - क्रिस्टी कोव्हेन्ट्री, झिम्बाब्वेची तरणपटू.
मृत्यू
- ९६ - डॉमिशयन, रोमन सम्राट.
- ३०७ - फ्लाव्हियस व्हॅलेरियस सेव्हेरस, रोमन सम्राट.
- ८२७ - पोप व्हॅलेन्टाइन.
- १०८७ - पोप व्हिक्टर तिसरा.
- १३८० - चार्ल्स पाचवा, फ्रान्सचा राजा.
- १४९८ - तोमास दि तोर्केमादा, स्पेनचा पहिला ग्रॅन्ड इन्क्विझिटर.
- १७०१ - जेम्स दुसरा, इंग्लंडचा राजा.
- १७३६ - गॅब्रिएल डॅनिएल फॅरनहाइट, पाऱ्याचा तापमापक तयार करणारा. जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८२४ - लुई अठरावा, फ्रान्सचा राजा.
- १९२५ - अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन,
- १९४४ - गुस्ताफ बाउअर, जर्मनीचा चॅन्सेलर.
- १९८९ - हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार.
- १९९४ - जयवंत दळवी, मराठी साहित्यिक.
- २००५ - गॉर्डन गूल्ड, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
प्रतिवार्षिक पालन
- सप्टेंबर १६ - जागतिक ओझोन संरक्षण दिन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर १६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर १४ - सप्टेंबर १५ - सप्टेंबर १६ - सप्टेंबर १७ - सप्टेंबर १८ - सप्टेंबर महिना