सप्टेंबर १२
साचा:सप्टेंबर२०२४
सप्टेंबर १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५४ वा किंवा लीप वर्षात २५५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
इ.स.पू. पाचवे शतक
सतरावे शतक
- १६८३ - व्हियेनाची लढाई - ऑस्ट्रिया व इतर युरोपीय देशांनी ऑट्टोमन साम्राज्याचा पराभव केला.
एकोणिसावे शतक
- १८४७ - मेक्सिकन अमेरिकन युद्ध - दल बदलून मेक्सिकोतर्फे लढणाऱ्या अमेरिकन सैनिकांना जनरल विनफील्ड स्कॉटने फाशी दिली.
- १८५७ - कॅलिफोर्निया गोल्ड रशमध्ये सापडलेले १३-१५ टन सोने घेउन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज केप हॅट्टेरास पासून १६० मैलावर बुडाले. सोन्यासह ४२६ प्रवाशांना जलसमाधी.
- १८९० - सॅलिसबरी, ऱ्होडेशिया शहराची स्थापना.
विसावे शतक
- १९३० - विल्फ्रेड ऱ्होड्सने आपल्या १,११०व्या व शेवटच्या प्रथमवर्गीय क्रिकेट सामन्यात ९५ धावा देऊन ५ बळी घेतले.
- १९३८ - एडोल्फ हिटलरने चेकोस्लोव्हेकियाच्या सुडेटेनलँडमधील जर्मन व्यक्तींना स्वतंत्र करण्याची मागणी केली.
- १९४० - केनव्हिल, न्यू जर्सी येथे कारखान्यातील स्फोटात ५१ ठार, २०० जखमी.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या पाणबुड्यांनी दोस्त राष्ट्रांचे सैनिक, नागरिक व इटालियन युद्धबंद्यांना घेउन जाणाऱ्या आर.एम.एस. लॅकोनिया जहाजाला बुडवले.
- १९४३ - ऍब्रुझी येथे पकडून ठेवलेल्या इटलीच्या हुकुमशहा बेनितो मुसोलिनीला जर्मनीच्या कमांडोंनी सोडवून नेले.
- १९४८ - आदल्या दिवशी झालेल्या मोहम्मद अली झीणाच्या मृत्यूचा फायदा घेउन भारतीय लष्कराने हैदराबाद संस्थानावर चाल केली व हैदराबाद मुक्त केले.
- १९७४ - इथियोपियाच्या सम्राट हेल सिलासीची लश्करी उठावात उचलबांगडी.
- १९७९ - इंडोनेशियात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.१ तीव्रतेचा भूकंप.
- १९८० - तुर्कस्तानमध्ये लश्करी उठाव.
- १९८३ - लोस मशेतेरोस या टोळीने हार्टफर्ड, कनेक्टिकटमधील बँकेतून ७० लाख अमेरिकन डॉलर पळवले.
- १९९२ - शायनिंग पाथचा म्होरक्या ऍबिमेल गुझमान पकडला गेला.
- १९९४ - फ्रँक युजीन कॉर्डरने सेसना १५० प्रकारचे विमान व्हाइट हाउसवर घातले.
एकविसावे शतक
- २००२ - 'मेटसॅट' या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
- २००३ - पॅन ऍम फ्लाइट १०३वर केलेल्या बॉम्बहल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याने लिब्यावरचे आर्थिक निर्बंध संयुक्त राष्ट्रांनी काढले.
- २००५ - डिझनीलँड हाँगकाँग खुले.
- २०१२ - दहशतवाद्यांनी लिब्यातील बेंगाझी आणि इजिप्तमधील कैरो शहरांतील अमेरिकन वकीलातींवर हल्ला चढवून वकीलाती नष्ट केल्या लिब्यातील अमेरिकन राजदूत जॉन क्रिस्टोफर स्टीवन्ससह तीन मृत्युमुखी.
- २०१२ - पाकिस्तानच्या कराची शहरातील कपड्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीत २८९ ठार.
जन्म
- १४९२ - लॉरेन्झो दि मेदिची दुसरा.
- १४९४ - फ्रांसिस पहिला, फ्रांसचा राजा.
- १५७५ - हेन्री हडसन, इंग्लिश शोधक.
- १९१३ - जेसी ओवेन्स, अमेरिकन धावपटू.
- १९२० - फिरोज गांधी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी
- १९३२ - वकार हसन, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९३७ - वेस्ली हॉल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९४८ - मॅक्स वॉकर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७७ - नेथन ब्रॅकेन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १२१३ - पीटर दुसरा, अरागॉनचा राजा.
- १३६२ - पोप इनोसंट सहावा.
- १६१२ - व्हासिली चौथा, रशियाचा झार.
- १६८३ - अफोन्सो सहावा, पोर्तुगालचा राजा.
- १९१८ - जॉर्ज रीड, ऑस्ट्रेलियाचा चौथा पंतप्रधान.
- १९५२ - सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर
- १९८० - सतीश दुभाषी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते.
- १९९२ - पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, गायक.
- १९९३ - रेमंड बर, अमेरिकन अभिनेता.
- १९९६ - श्रीमती पद्मा चव्हाण नाट्य, चित्रपट अभिनेत्री.
- २००३ - जॉनी कॅश, अमेरिकन संगीतकार, गायक.
प्रतिवार्षिक पालन
- राष्ट्रीय दिन - केप व्हर्दे.
- राष्ट्रीय क्रांती दिन - इथियोपिया.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर १२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर १० - सप्टेंबर ११ - सप्टेंबर १२ - सप्टेंबर १३ - सप्टेंबर १४ - सप्टेंबर महिना