सनरायझर्स हैदराबाद
सनरायझर्स हैदराबाद | |
पूर्ण नाव | सनरायझर्स हैदराबाद |
---|---|
स्थापना | २०१२ |
मैदान | राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (आसनक्षमता ५५,०००) |
मालक | कलानिधी मारन, सन नेटवर्क |
प्रशिक्षक | डॅनियल व्हेट्टोरी |
कर्णधार | पॅट कमिन्स |
लीग | भारतीय प्रीमियर लीग |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
पहिला सामना | एप्रिल ५ २०१३ हैदराबाद वि पुणे |
सद्य हंगाम |
सनरायझर्स हैदराबाद (तेलुगू: సన్ రైజర్స్ హైదరాబాద్, उर्दू: سنسرس حیدرآباد) (सहसा SRH या नावाने संबोधित) हा संघ इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत हैदराबाद शहराचे प्रतिनिधित्व करतो [१]. सन नेटवर्कचे कलानिधी मारन हे या संघाचे मालक आहेत[२]. कुमार संघकारा सद्य स्थितीत या संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे.[३] टॉम मूडी हे प्रमुख प्रशिक्षक, सायमन हेलमोट हे सह प्रशिक्षक तर वकार युनिस आहेत. कृष्णम्माचारी श्रीकांत आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हे संघाचे मार्गदर्शक आहेत.[४][५]
संघाच्या पहिल्या सीझन मध्ये (२०१३ इंडियन प्रीमियर लीग) संघाने प्ले ऑफ पर्यंत मजल मारली. परंतु बाद फेरीत राजस्थान रॉयल्सकडून ४ गडी राखून पराभूत झाल्यामुळे स्पर्धेतून बाद झाला[६]. या संघाने २०१८ च्या आय.पी.एल.साठी डेविड वार्नर आणि भुवनेश्वर कुमार या दोघाला रिटेन केले आहे. २०१६ या वर्षी या संघाने आय.पी.एल.चे विजेते पद पटकावले होते.
संदर्भ
- ^ "आय. पी. एल. मध्ये सनरायझर्स करतील हैदराबादचे प्रतिनिधित्व". 2017-06-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-06-29 रोजी पाहिले.
- ^ सन टीव्ही नेटवर्क हैदराबाद आय. पी. एल. संघाचे मालक
- ^ sunrisers Hyderabad
- ^ "सनरायझर्स हैदराबाद सपोर्ट स्टाफ". 2013-12-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-06-29 रोजी पाहिले.
- ^ वकार युनूस सनरायझर्सचे गोलंदाजी प्रशिक्षक
- ^ राजस्थानचा रॉयल विजय[permanent dead link]