सदाशिवनगर
?सदाशिवनगर महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | माळशिरस |
जिल्हा | सोलापूर जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
सदाशिवनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे.
पार्श्वभूमी
सदाशिवनगर हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यामधील माळशिरस तालुक्यातील गाव आहे. येथे शंकर सहकारी साखर कारखाना आहे. सदाशिवनगर परिसरातील शेतकरी या कारखान्यावर विसंबून आहेत. हा ४ं,००० टनी कारखाना आसपास उगवणाऱ्या उसातून साखर तयार करतो. हा कारखाना शिखर शिंगणापूरच्या पायथ्याशी असल्यामुळे कारखान्याचे नाव शंकर असे ठेवले गेले आहे. हे गाव पुणे-पंढरपूर (जुना महाड-पंढरपूर रस्त्यावर आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.