सदानंद दाते
सदानंद दाते ( १४ डिसेंबर १९६६) हे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी भारतीय पोलीस सेवेतील अनेक राष्ट्रीय आणि राजकिय पदांवर काम केले आहे.डॉ. दातेंनी केंद्रीय अन्वेषण विभागाचे उप महासंचालक म्हणून देखील काम पाहिले आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळवली असून ते आय.सी.डब्लू.ए.चे ते अधिकृत सदस्य आहेत. सध्या ते मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. २००७ साली त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.