Jump to content

सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन

पहिले राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन महाराष्ट्रातल्या बीड या शहरी २ ते ४ ऑक्टोबर २०१० या काळात झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले होते. सत्यशोधक ओबीसी परिषद ही संमेलने भरवते. खासदार शरद यादव हे या परिषदेचे सध्याचे(इ.स. २०१३) राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर उपाध्यक्ष हनुमंत उपरे आहेत.

त्याहूनही आधीचे (पहिले) तथाकथित अखिल भारतीय ओ.बी.सी. साहित्य संमेलन २००६ साली झाले. दुसरे अखिल भारतीय ओ.बी.सी. साहित्य संमेलन १६-१७-१८ फेब्रुवारी २००८ या तारखांना नाशिकच्या 'तात्यासाहेब महात्मा फुले साहित्य नगरी'त झाले.

त्यानंतरचे दुसरे (नुसतेच) ओबीसी साहित्य संमेलन सोलापूर येथे ९-१० फ़ेब्रुवारी २०१३ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार होते.

ओबीसी सेवा संघ, महाराष्ट्र या बिगर राजकीय संघटनेतर्फे एक ओबीसी साहित्य संमेलन ४ ऑक्‍टोबर २०१५ रोजी चिंचवड (पुणे)च्या चैतन्य सभागृहात झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. बाबुराव गुरव होते. या संमेलनात किसन महाराज चौधरी यांच्यासहित अनेकांना ’ओबीसी जाणीव पुरस्कार’ देण्यात आले.

फेब्रुवारी २००८मध्ये झालेल्या २ऱ्या अखिल भारतीय ओ.बी.सी. साहित्य संमेलनाच्या वेळी काढलेले एक हिंदी-इंग्रजी परिपत्रक इथे[permanent dead link] आहे.


पहा : सत्यशोधकी साहित्य संमेलन; महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन