सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ही जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करण्यासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये निर्माण केलेली स्पर्धा आहे. स्पर्धेचा पाया हा ज्ञान आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक गावातील पाच प्रशिक्षणार्थीना 'पानी फाऊंडेशन’ पाणलोट विकासाच्या विज्ञानाचे प्रशिक्षण देते. त्यानंतरच हे गावकरी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत भाग घेतात. ४५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत गावकरी श्रमदानाने तसेच मशीनच्या सहाय्याने जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण रचना उभारून पाणी साठवण क्षमता निर्माण करतात.
विजेत्या गावांपैकी प्रथम क्रमांकाला ७५ लाख, द्वितीय क्रमांकाला ५० लाख आणि तृतीय विजेत्याला ४० लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येतो. [१]
सत्यमेव जयते वॉटर कप २०१७
२०१७ला झालेल्या ‘दुसऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत ३० तालुक्यांतील एकूण १३२१ गावांनी भाग घेतला आणि तब्बल ८३६१ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण केली. त्यात वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील काकडदरा या छोट्याशा आदिवासी गावाने बाजी मारत वॉटर कप २०१७ जिंकला.[२]
सत्यमेव जयते वॉटर कप २०१८
सत्यमेव जयते वॉटर कप 201८’ स्पर्धेत सहभागासाठी पात्र ठरलेल्या ७५ तालुक्यांची नावं
उत्तर महाराष्ट्र विभाग
जिल्हा : जळगाव, तालुका : अमळनेर, पारोळा
जिल्हा : नंदुरबार, तालुका : शहादा, नंदुरबार
जिल्हा : धुळे, तालुका : धुळे, सिंदखेड
जिल्हा : नाशिक, तालुका : चांदवड, सिन्नर
जिल्हा : अहमदनगर, तालुका : जामखेड, पाथर्डी, अहमदनगर, पारनेर, कर्जत[३]
पश्चिम महाराष्ट्र विभाग
जिल्हा : सातारा, तालुका : माण, खटाव, कोरेगाव
जिल्हा : सोलापूर, तालुका : सांगोला, उत्तर सोलापूर, करमाळा, बार्शी, माढा, मंगळवेढा
जिल्हा : सांगली, तालुका : आटपाडी, जत, खानापूर, कवठेमहांकाळ, तासगाव
जिल्हा : पुणे, तालुका : बारामती, इंदापूर, पुरंदर[४]
विदर्भ विभाग
जिल्हा : बुलडाणा, तालुका : मोताळा, जळगाव जामोद, संग्रामपूर
जिल्हा : अकोला, तालुका : अकोट, पातुर, बार्शी टाकळी, तिल्हारा
जिल्हा : वाशिम, तालुका : कारंजा, मंगरुळ पीर
जिल्हा : अमरावती, तालुका : धारणी, वरुड, मोर्शी, चिखलदरा, नांदगाव
जिल्हा : यवतमाळ, तालुका : राळेगाव, कळंब, उमरखेड, यवतमाळ, घाटंजी, धारवा
जिल्हा : वर्धा, तालुका : अर्वी, देवळी, कारंजा घाडगे, सेलू
जिल्हा : नागपूर, तालुका : नरखेड[५]
मराठवाडा विभाग
जिल्हा : औरंगाबाद, तालुका : खुलताबाद, फुलंब्री, वैजापूर
जिल्हा : बीड, तालुका : केज, धारुर, अंबाजोगाई, अष्टी, परळी वैजनाथ
जिल्हा : उस्मानाबाद, तालुका : कळंब, भूम, परांडा, उस्मानाबाद
जिल्हा : हिंगोली, तालुका : कळमनुरी
जिल्हा : परभणी, तालुका : जिंतूर
जिल्हा : नांदेड, तालुका : भोकर, लोहा
जिल्हा : जालना तालुका : जाफराबाद
जिल्हा : लातूर तालुका : औसा, निलंगा, देवणी[६]
सत्यमेव जयते वॉटर कप २०१९
‘पाणी’ फांउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत राज्यस्तरावर सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सुर्डी या गावाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. सिने अभिनेते आणि पाणी फाउंडेशनचे प्रमुख आमीर खान आणि किरण राव यांच्या हस्ते सरपंचांसह ग्रामस्थांनी हा पुरस्कार स्विकारला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सुर्डी गावाला पाणी फाउंडेशनकडून ७५ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले आहे. पुण्यातील बालेवाडी येथे पाणी फांउडेशनच्यावतीने शानदार पुरस्कार सोहळा पार पडला. सोलापूर जिल्ह्यातून 6 तालुक्यांची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली होती. त्यामध्ये, बार्शी, करमाळा, उत्तर सोलापूर, माढा, मंगळवेढा आणि सांगोला या तालुक्यांचा सहभाग होता.[७]
वॉटर कप स्पर्धेतील विजेते :
प्रथम क्रमांक : सुर्डी गाव (ता.बार्शी, सोलापूर)
व्दितीय क्रमांक : पिंपरी जलसेन (ता.पारनेर,अहमदनगर) शिंदी खुर्द (ता.माण, सातारा)
तृतीय क्रमांक आनोरे (ता.अमळनेर, जळगाव) देवऱ्याची वाडी (बीड) बोरव्हा बुद्रुक(ता.मंगरूळपीर जि. वाशिम)[८]
बाह्य दुवे
- https://abpmajha.abplive.in/mumbai/pani-foundation-announces-satyameva-jayate-water-cup-2019[permanent dead link]
- https://abpmajha.abplive.in/maharashtra/pani-foundation-satyamev-jayate-water-cup-spardha-2018[permanent dead link]
- https://www.dainikprabhat.com/panni-foundation-water-cup-contest
संदर्भ आणि नोंदी
- ^ "सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 ची घोषणा, 75 तालुक्यांची निवड". 2019-10-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले.
- ^ "सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 ची घोषणा". https://abpmajha.abplive.in. 2019-10-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले. External link in
|संकेतस्थळ=
(सहाय्य) - ^ "सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 ची घोषणा, 75 तालुक्यांची निवड". 2019-10-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले.
- ^ "सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 ची घोषणा, 75 तालुक्यांची निवड". 2019-10-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले.
- ^ "सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 ची घोषणा, 75 तालुक्यांची निवड". 2019-10-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले.
- ^ "सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 ची घोषणा, 75 तालुक्यांची निवड". 2019-10-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले.
- ^ "पाणी फांउडेशन वॉटर कप स्पर्धा : बार्शी तालुक्यातील सुर्डी गाव राज्यात प्रथम". 30 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले.
- ^ "पाणी फांउडेशन वॉटर कप स्पर्धा : बार्शी तालुक्यातील सुर्डी गाव राज्यात प्रथम". 30 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले.