Jump to content

सत्यनाथन अतलुरी

सत्यनाथन अतलुरी हे अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया ॲट अर्व्हाइन येथील एरोस्पेस इंजिनिअरींगचे प्राध्यापक आहेत. त्यांनी इ.स. १९६६ मध्ये बंगळूरमधील भारतीय विज्ञान संस्थामधून एम.टेक. तर इ.स. १९६९ मध्ये अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून डी.एस.सी. या पदव्या मिळविल्या आहेत. त्यानंतर त्यांनी जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया ॲट लॉस एंजेलस यासारख्या विद्यापीठांमध्ये अध्यापन केले. इ.स. १९८८ मध्ये भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांचे भारताला संशोधनात पुढे न्यायला काय करता येईल यासाठी सल्लागार होते. इ.स. २००२ मध्ये भारतीय विज्ञान संस्थाचा त्यांना सर्वोत्तम माजी विद्यार्थी हा सन्मान मिळाला. तसेच इ.स. २०१२ मध्ये त्यांचा भारत सरकारने पद्मभूषण देऊन गौरव केला.