सती (विद्याधर पुंडलिक)
विद्याधर पुंडलिकांची ’सती’ ही दीर्घकथा सत्यकथेच्या १९७४ सालच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या व्यक्तिगत जीवनावर आधारित त्यांच्या या कथेवरून मोठे वादळ उठले होते. पुंडलिकांच्या तोंडाला काळे फासण्यापर्यंत सावरकरभक्तांची मजल गेली होती. विचित्र योगायोग म्हणजे, स्वतः पुंडलिक सावरकरांचे चाहते व हिंदुत्ववादी प्रकृतीचे होते. पण या हल्ल्यामुळे ते डगमगले नाहीत. त्यामुळे सत्यकथेचे संपादक श्री.पु.भागवत आणि पुंडलिक यांना कोर्टातही खेटे मारावे लागले. पण दोघांनीही तडजोडवादी भूमिका घेतली नाही.