Jump to content

सडादाढोली

ग्रामदेवता




थोडक्यात माहिती

मौजे सडादाढोली हे ग्रामपंचायात सडावाघपूरच्या हद्दीतले तालुका पाटण आणि जिल्हा सातारा जिल्हा मधील एक छोटेसे गाव आहे. सडादाढोली हे ठिकाण चाफळ श्रीराम मंदिरापासून पश्चिमेस ६ ते ७ किमी सह्याद्री पर्वतरांगेच्या पठारावर वसलेले हे गाव आहे . ग्रामदैवत दाढोबा (शिदोबा दाढोबा) या दैवताच्या नावावरून सडादाढोली हे नाव गावाला प्रचलित झाले अशी थोरांची आख्ययिका आहे ."सडा " हा शब्द पठारावरील सपाट खडकाळ भागाला बोलला जाणारा ग्रामीण बोलीभाषेतील शब्द आहे त्यावरून "सडादाढोली" असा नामोद्गार प्रचलित झाला.या क्षेत्राला पूर्वो "भैरवगड" या नावाने ओळखले जायचे . त्याचाही एक सविस्तर इतिहास आहे. खूप वर्षांपासून इथे गवळी धनगर गवळी धनगर समाजाचे लोक राहतात.

हि भूमी समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्श झाल्याचे इतिहासात दाखले पाहायला मिळतात आणि इथंच रामदास्वामीनी " रामघळची निर्मिती केल्याचे ग्रंथात दाखले आहेत . रामदास स्वामी तिथे ध्यानसाधना करण्याकरता तिथे वास्तव्य करीत असत.काही वर्षांपूर्वी रामघळ क्षेत्राला महाराष्ट्र शासन तर्फे " क " श्रेणीचा पर्यटन दर्जा प्राप्त झाला आहे. बरेच शहरातील पर्यटक व भक्तजन रामघळीला भेट देन्या करता गर्दी करतात. पर्यटक व भक्तजणांना गैर सोया होऊ नये म्हणून रामघळ कुबडीतीर्थ ट्रस्ट मार्फत पाणीची व्यवस्था , संरक्षित रेलिंग , सौचालाय आदींची सुविधा करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सदर गाव हे परमपूज्य ब्र.भू.वै.स.स. कै. जनार्दन महाराज वसंतगडकर ह्यांच्या परम चरणाने पावन झाले आहे आणि काही काळ त्यांचे वास्तव्य होते . त्यांनीच सन २००४ साली समर्थांच्या नावावरून सडादाढोलीचे 'समर्थनगर " असे नामकरण केले. तेव्हापासून "समर्थनगर सडादाढोली " नाव प्रचलित आहे . त्यांच्या जयनीतीनिमित्त गावात कार्यक्रम राबवले जातात . "दासनवमी " निमित्त गावात हरिनाम पारायण दरवर्षी साजरे केले जाते.


पोहचण्याचे मार्ग

पाटण - तारळे मार्ग :

पाटण पासून कमीतकमी १२ किमी सदर मार्गावरून प्रवास केल्यास खंडूआई मंदिरापासून उजवीकडे वळल्यास ३.५ किमी पर्यंतचा महाबलवाडीतून पुढे सडादाढोली इथे पोहचता येते.

उंब्रज- पाटण रोड :

उंब्रजपासून पोहचण्याकरता चाफळ मार्गे २३ किमी अंतर आहे.

Map



पायी मार्ग

१. नवारस्ता - नाडली ही गाव पूर्ण करत डोंगरकपाऱ्यातून २ तासाची पायवाट मार्गे इथे पोचता येते. पूर्वी हा मार्ग अनेकदा वापरला जायचया.

२. चाफळ - शिंगणवाडी - बोरगेवाडी - बहिरेवाडी करत सडादाढोली हा १.५० तासाचा पायी मार्ग आहे.

३. ठोमसे -बांबर वाडी - सडादाढोली हा गावच्या पूर्वेच्या दिशेने २ तासाचा पायी मार्ग आहे.


निसर्ग पर्यटन

१. ऐरन कुंड शेजारी पावसाळी उलटा धबधबा

२. शिखरभैरी देवालय

३. कोयनादर्शन (केळदारं )

४. रामदर्शन (चाफळ) टोक

नैसर्गिक झरे

१. नवसरी झरा

२. शेंडेंचा झरा

३. खोपतला झरा

४. कुबडीतीर्थ (टाके झरा )