सटवाई
सटवाई देवी ही देवी नवजात शिशू बालकांचे भविष्यलेखन करणारी देवता आहे असा हिंदू पुराण कथांमध्ये लिहिले आहे.या आई सटवाई देवीस सटवी, सटुआई, सटवीका इत्यादी नावांनी ओळखले जाते. नशीब देवता असेही म्हणतात. सर्वसाधारण पणे बाल अथवा बालिकेचे जन्माचे सहावे दिवशी या देवीची पूजा करण्यात येते. असा एक समज आहे कि सटवाई देवी ही कोणत्याही रूपाने येऊन त्या बालकाचे विधीलिखित लिहिते.एक कोरा पांढरा कागद व टाक/पेन पूजेच्या ठिकाणी ठेवले जाते. झोपेत हसणाऱ्या बाळास 'सटवाई हसविते' असाही एक समज आहे. मराठवाड्यातील ग्रामीण भागात या देवीची पूजा जास्त प्रचलित आहे. ताई सटवाई देवी मराठवाड्यातील अनेक गावांची ग्रामदेवता आहे.हिच्या देवळाचे सहसा बांधकाम करीत नाहीत. फक्त आडोसा असतो. सटवाई देवीचे माहेर मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात असुन देवी जास्तीत जास्त लातूर जिल्ह्यात संचार करीत असते.
देवी सटवाई हिच नशीब देवता , भाग्य देवता , मृत्यू देवता व आयुष्य देवता व भविष्य देवता या नावांनी ओळखली जाते.
"सटीचा लेखाजोखा, न चुके ब्रम्हादिका" अशी एक म्हण या देवीबाबत प्रचलित आहे. देवी सटवाई ताई सटवीकेचे माहेर जन्मस्थान , मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात असुन ते आजही गुप्त रहस्य आहे. देवी सटवाई ही महार जातीतील आराध्यदैवता म्हणून ओळखली जाते. हिंदू पुराण कथांमध्ये भगवान ब्रह्मदेवाची बहिण हिच देवी सटवाई आहे. देवी सटवाई मातेचे कार्य व दैविक अधिकार खालीलप्रमाणे.-
- (१) मनुष्याचे नशीब लिहिणे व नशीब पुसणे.
- (२) मनुष्याचे आयुष्य कमी करणे किंवा वाढवणे.
- (३) मनुष्याच्या जन्म व मृत्यूची नोंद करणे.
- (४) मनुष्याचे आयुष्य कमी जास्त करणे.
- (५) आपल्या भक्तांचे रक्षण व संरक्षण करणे.
- (६) मनुष्याच्या जीवनात संकटे देणे.
- (७) समाजातील वाईट लोकांना दैविक मृत्यू दंडाची शिक्षा देऊन ह्दयविकार घडवून देणे. तसेच दैविक अपघात घडवणे.
- (८) पृथ्वीवरील लोकांच्या जन्म आणि मृत्यूच्या तारखा नोंद करून संवर्गातील देवी देवतांना कळवणे.
पवित्र हिंदू धर्म संहितेनुसार देवी सटवाई मातेला मानाचं स्थान आहे.