Jump to content

सजीव कुंपण

सजीव कुंपण किंव्हा जीवंत कुंपण हे शेतमालाची अथवा शेतीतील अवजारांची चोरी वाचविण्यासाठी, जनावरांचा उपद्रव व त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतीला करण्यात येणारे एक वनस्पतींचे कुंपण असते. यासाठी बहुतेकवेळी जलद वाढणाऱ्या, प्रतिकूल वातावरणातही तग धरणाऱ्या काटेरी वनस्पतींचा वापर करण्यात येतो. या वनस्पती अथवा झुडुपे ही जनावरांना खाण्यास निरुपयोगी असणे आवश्यक आहे.

योग्य वनस्पती

केतकी, बांबू, मेहंदी. बेशरम खैर, शिकेकाई घायपात काटेरी बाभूळ सागरगोटा करवंद, मोगली एरंड चिलार तोरणी निवडुंग घाणेरी अडुळसा बोगनव्हीला इत्यादी वनस्पती या सजीव कुंपणासाठी योग्य असतात. बहुतेककरून, ज्यांची पाने अथवा फांदी तोडली असता, त्यातून दुधासारखा द्रव निघतो अशा वनस्पती जनावरे खात नाहीत.

फायदे

  • जमिनीची धूप थांबते.
  • वारे अथवा वादळ यापासून पिकांचे संरक्षण
  • चोरीची शक्यता कमी अथवा नाही
  • शेतमालाचा व साहित्याच्या चोरीपासून बचाव
  • टिकावू
  • नैसर्गिक समतोल साधल जातो
  • जळाऊ कालूड मिळते.