Jump to content

सचिन पायलट

सचिन पायलट

सचिन पायलट (७ सप्टेंबर, १९७७ (1977-09-07) (वय: ४६) ) हे भारतीय संसद सदस्य आहेत. राजस्थानच्या दौसा मतदारसंघ मार्फत ते संसद प्रतिनिधित्व करत आहेत. ते काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत.

सुरुवातीचा काळ

सचिन पायलट हे काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते राजेश पायलट यांचे सुपुत्र आहेत. त्यांचे शाळेय शिक्षण नवी दिल्ली येथील हवाई दल बालभारती शाळेत होऊन बी.ए.(ऑनर्स) सेंट स्टीफंस्, दिल्ली विद्यापीठ मधुन केले. महाविद्यालय मध्ये असताना पायलट विद्यालय शुटिंग दलाचे कप्तान होते. त्यांनी एम.बी.ए. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ, अमेरिका येथील वारटन महाविद्यालयातुन केले.

राजकीय वाटचाल

परदेशाहुन परतल्यावर १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. हा दिवगंत राजेश पायलट यांचा जन्म दिवस होता. या दिवशी मोठा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. १३ मार्च २००४ रोजी १४ व्या लोकसभेसाठी राजस्थानच्या दौसा मतदारसंघ पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडुन आले. वयाच्या २६ व्या वर्षी निवडुन आलेले पायल्ट हे भारताचे सर्वात लहान संसद सदस्य ठरले. पायलट ग्रह खात्याचे पार्लिमेंट स्टॅडींग समितीचे सदस्य आहेत. तसेच नागरी उड्डान खात्याच्या सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत.

व्यक्तीगत जीवन

२००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरी राजकारणी फारुख अब्दुल्ला यांच्या सुपुत्री सराह अब्दुलाशी विवाह केला.[]

संदर्भ

[१] Archived 2020-07-16 at the Wayback Machine.