सचखंड एक्सप्रेस
१२७१५/१२७१६ सचखंड एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी रेल्वेसेवा आहे. दक्षिण मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही गाडी महाराष्ट्राच्या नांदेड शहराला पंजाबमधील अमृतसरसोबत जोडते. नांदेड व अमृतसर ही दोन्ही शीख धर्मातील पवित्र धर्मस्थळे आहेत. हुजूर साहिब नांदेड गुरुद्वाराला सचखंड नावाने संबोधित केले जात असल्यामुळे ह्या गाडीला सचखंड एक्सप्रेस असे नाव दिले गेले आहे. ही गाडी नांदेडच्या हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक ते अमृतसरच्या अमृतसर रेल्वे स्थानकांदरम्यान रोज धावते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली व पंजाब राज्यांतून धावणारी सचखंड एक्सप्रेस नांदेड व अमृतसर दरम्यानचे २,०८१ किमी अंतर ३४ तास व ५० मिनिटांत पूर्ण करते.
प्रमुख थांबे
- हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक
- पुर्णा रेल्वे स्थानक
- परभणी रेल्वे स्थानक
- जालना रेल्वे स्थानक
- औरंगाबाद रेल्वे स्थानक
- मनमाड रेल्वे स्थानक
- जळगाव रेल्वे स्थानक
- भुसावळ रेल्वे स्थानक
- खंडवा रेल्वे स्थानक
- इटारसी रेल्वे स्थानक
- भोपाळ रेल्वे स्थानक
- झाशी रेल्वे स्थानक
- ग्वाल्हेर रेल्वे स्थानक
- आग्रा छावणी रेल्वे स्थानक
- हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक
- नवी दिल्ली रेल्वे स्थानक
- अंबाला छावणी रेल्वे स्थानक
- लुधियाना रेल्वे स्थानक
- जालंधर शहर रेल्वे स्थानक
- अमृतसर रेल्वे स्थानक