Jump to content

सखोल शेती

लागवडीलायक जमिनीची कमतरता असलेल्या व दाट लोकसंख्या असलेल्या भागांत उपलब्ध जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी जी शेती केली जाते तिला सखोल शेती म्हणतात. सखोल शेतीमध्ये बहुतांशी प्रदेशांत प्रामुख्याने भात हे एकमेव पीक घेतले जाते. या प्रदेशात सखोल शेतीचे स्वरूप उदरनिर्वाहाचे असते.

यामध्ये जमिनीचा सखोल वापर करून उत्पादन वाढीसाठी संकरित बियाणे, रासायनिक खते, कीटनाशके आणि जलसिंचनाचा उपयोग केला जातो.