Jump to content

सईदुद्दीन डागर

सईदुद्दीन डागर (जन्म : इ.स. १९३९; - ३१ जुलै २०१७) हे धृपद गाणाऱ्या डागर घराण्याचे १९वे वंशज होते. त्यांचे वास्तव्य पुणे शहरात असे. त्यांचे चिरंजीव नफीसुद्दीन आणि अनीसुद्दीन हेही धृपद गायक आहेत.

सईदुद्दीन डागर यांना मिळालेले पुरस्कार

  • पुणे महापालिकेतर्फे बालगंधर्व पुरस्कार (२६ जून २०१६)
  • पुण्याच्या गानवर्धन संस्थेतर्फे गायिका सुहासिनी कोरटकर यांनी पुरस्कृत केलेला पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या नावाचा ’संगीतभूषण पुरस्कार’. (२७-२-२०१६)
  • पी.एन. गाडगीळ सराफ यांच्याकडून ‘रसिकाग्रणी दाजीकाका गाडगीळ पुरस्कार’ (जानेवारी २०१७)