संस्कृत विकिपीडिया
संस्कृत विकिपीडियाचे संस्थाचिन्ह | |
ब्रीदवाक्य | मुक्त ज्ञानकोश |
---|---|
प्रकार | ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प |
उपलब्ध भाषा | संस्कृत |
मालक | विकिमीडिया फाउंडेशन |
निर्मिती | जिमी वेल्स, लॅरी सॅंगर |
दुवा | http://sa.wikipedia.org/ |
व्यावसायिक? | चॅरिटेबल |
नोंदणीकरण | वैकल्पिक |
अनावरण | डिसेंबर, इ.स. २००३ |
आशय परवाना | क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.० |
संस्कृत विकिपीडिया हे विकिपीडियाचे संस्कृत संस्करण असून विकिमीडिया संस्था समर्थित विनाशुल्क, जालाधारित, सहयोगी, बहुभाषी विश्वकोश प्रकल्प आहे. आतापर्यंत ह्या विकिपीडियावर जगभरातील प्रतिनिधींद्वारे आणि विशेषत भारत व नेपाळमधील योगदानकर्त्यांमुळे ५००० लेख लिहिण्यात आले आहेत. ह्या विकिपीडियाची स्थापना डिसेंबर २००३ साली झाली असून ऑगस्ट २०११ पर्यंत ही ५००० लेखसंख्येपर्यंत पोहोचली आहे.
संस्कृत विकिपीडिया समुदायाने सहभाग घेतलेले प्रकल्प पुढीलप्रमाणे
- टेल अस अबाउट युवर विकिपीडिया
- विकिपत्रिका (विकिपीडियाशी संबंधित समुदायलिखित व संपादित वर्तमानपत्र, कथा, घटना व अहवाल)
- भारतातील विकिमीडिया फाऊंडेशन सिस्टर प्रोजेक्ट
ऑगस्ट २०१६ पर्यंत १०,१७७ लेखांसह संस्कृत विकिपीडियेचा १३२वा क्रमांक लागतो. संस्कृत विकिपीडियेविषयी द टाईम्स ऑफ इंडिया म्हणते-"संस्कृतचे पुनरूज्जीवन चालू आहे, धन्यवाद विकिपीडिया समुदाय" आणि मदर इंडियाच्यामते संस्कृत विकिपीडिया हे शिक्षणाचे अद्भुत साधन आहे.
प्रारंभिक इतिहास
संस्कृत विकिपीडियावरील एकदम सुरुवातीचे मुखपृष्ठ दिनांक १जून २००४साली प्रकाशित करण्यात आले होते.दिनांक ९जुलै २००४ साली लिहिलेले दमण दीव हे विकिपीडियावरील सर्वात आधीचे पृष्ठ आहे परंतु सर्वप्रथम लेख २१मार्च २००४ साली लिहिण्यात आला होता.
१०००पैकी ६००लेख ऑगस्ट २०१५पर्यंत वगळण्यात आले नव्हते मात्र नंतर त्यातले अर्धे लेख वगळण्यात आले.लेख वगळण्याचे मुख्य कारण बहुतांशी लेख हे इंग्रजीत होते.१२डिसेंबर २०१३ पर्यंत संस्कृत विकिपीडियामधील लेखसंख्या ही ९,०४५ इतकी झाली.
संस्कृतभारतीसह सहयोगी कार्य
संस्कृतभारती ह्या संस्कृत पुनरुज्जीवनाकरिता काम करणाऱ्या संस्थेसह संस्कृत विकिपीडिया एकत्र काम करीत आहे.हे सहयोगी कार्य २३जानेवारी २०१०साली बंगळूरु येथे आयोजित विकिपीडिया अकादमीत सुरू झाले. तसेच ही भारतातील पहिली विकिपीडिया अकादमी आहे.
ह्या अकादमीत संस्कृतभारतीचे ११ सभासद सहभागी होते.त्यांना प्रकल्पाचे प्रारूप समजावण्यात आले आणि त्यांनी विकिपीडियावर योगदान देण्यास सुरुवात केली.ह्या कामात केवळ ३ इतर विकिपीडियाकार्यकर्त्यांची मदत त्यांना लाभली.
यानंतर २० सभासद प्रेक्षकांसाठी संस्कृत भारतीच्या बंगळूरु येथील कार्यालयात पहिली संस्कृत विकि कार्यशाळा आयोजित करण्यात आली.विकिपीडियाची मूलभूत कार्यपद्धती समजण्याकरिता सादरीकरण करण्यात आले होते.
सॉफ्टवेर कंपन्या आणि ओम शांतीधाम गुरुकुलम् यांनी त्याच ठिकाणी दिनांक २६मार्च २०११ रोजी आणखी १५ सभासदांसाठी दुसरी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
इतर सहयोग कार्यक्रम
जुलै २०१२साली, गुजरात विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या पुढाकाराने दोन दिवसीय कार्यशाळा ज्याचे नाव संस्कृत विकिपीडिया-परिचय आणि अपेक्षा होते, ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. गुजरातमधील विविध महाविद्यालयांच्या जवळजवळ १५०संस्कृत शिक्षकांनी दोन दिवसीय कार्यशाळेत एकत्र येऊन संस्कृत विकिपीडियावर लेखांचे संपादन केले.