Jump to content

संसद

नवी दिल्ली येथील भारताची संसद
ब्रिटिश संसदेचे हाउस ऑफ कॉमन्स हे कनिष्ठ सभागृह

संसद (इंग्रजी: Parliament) हे लोकशाही मार्गाने चालणाऱ्या देशाचा अथवा राष्ट्राचे एक विधिमंडळ आहे.भारतीय राज्यघटनेत कलम ७९ अनुसार संसदेची तरतूद केली आहे. संसदेमध्ये एक किंवा अधिक सभागृहे असतात व येथे कायदे मंजूर करणे, धोरणे ठरवणे, चर्चासत्र इत्यादी कार्ये चालतात. अनेक देशांच्या प्रशासकीय विभागांची वेगळी संसद अस्तित्वात आहे.

संसदेमध्ये लोकशाही व निवडणुकीच्या मार्गाने निवडून आलेले सदस्य आपापल्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करतात. संसदीय राज्यपद्धतीमध्ये पंतप्रधान हा संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचा प्रमुख असतो व तो व त्याचे मंत्रीमंडळ सरकारची धोरणे व प्रस्ताव संसदेसमोर मांडतात.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत