संयुगे
संयुग (अनेकवचन:संयुगे) ही रसायनशास्त्रातील एक संज्ञा आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक मूलद्रव्ये रासायनिक बंधनांनी जोडली गेली की संयुगाची निर्मिती होते. वेगवेगळ्या संयुगाचे रासायनिक व भौतिक गुणधर्म वेगवेगळे असतात. मूलद्रव्यांमध्ये विद्युतपरमाणुची देवाण-घेवाण किंवा विद्युतपरमाणुच्या भागीदारीमुळे संयुगे तयार होतात. धातू आणि अधातू मूलद्रव्यांमध्ये विद्युतपरमाणुची देवाण-घेवाण होते.
संयुगाचे आयनिक संयुगे व सहसंयुज संयुगे असे प्रकार पडतात.
१) आयनिक संयुगे- मूलद्रव्यांमध्ये विद्युतपरमाणुची देवाण-घेवाण मुळे ही संयुगे तयार होतात. आयनिक संयुगाचे धन प्रभारीत व ऋण प्रभारीत आयन असे दोन घटक असतात. दोन भिन्न प्रभारामुळे या दोन आयनांमध्ये आकर्षण बल कार्यरत असते यालाच "आयनिक बंध" असे म्हणतात. धन प्रभारीत कणांना कॅटायन आणि ऋण प्रभारीत कणांना ऍनायन असे म्हणतात.
२) सहसंयुज संयुगे-मूलद्रव्यांमध्ये विद्युतपरमाणुची भागीदारीमुळे ही संयुगे तयार होतात. ह्या संयुगामध्ये दोन अणूंदरम्यान इलेक्ट्रॉन-जोड्यांनी बनणारा सहसंयुज बंध असतो. यात प्रत्येक अणू बंधासाठी लागणाऱ्या जोडीपैकी एक विद्युतपरमाणु देतो. ही संयुगे मेदात विरगळतात