संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद
संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद United Nations Security Council (इंग्रजी) مجلس أمن الأمم المتحدة (अरबी) las Naciones Unidas (स्पॅनिश) | |
---|---|
प्रकार | मुख्य अंग |
मुख्य | रशिया (ऑगस्ट, इ.स. २०१०) |
स्थिती | कार्यरत |
स्थापना | इ.स. १९४६ |
संकेतस्थळ | www.un.org/sc |
संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद हे संयुक्त राष्ट्रसंघाचे एक मुख्य अंग आहे. सुरक्षा समितीवर जागतिक सुरक्षा व शांतता राखण्याची जबाबदारी आहे.सुरक्षा परिषदेत एकूण पंधरा सभासद राष्ट्रे असतात.अमेरिका,फ्रान्स,इंग्लैंड, रशिया व चिन ही पाच राष्ट्रे सुरक्षा परिषदेची स्थायी सभासद आहेत.दहा अस्थायी सभासद राष्ट्रांची निवड इतर सदस्य राष्ट्रांमधून दोन वर्षासाठी केली जाते.सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सभासदांना नकाराधिकार असतो.स्थायी सभासद राष्ट्रांच्या संमती नाकारण्याच्या अधिकाराला नकाराधिकार म्हणतात.कोणत्याही निर्णयात या पाच राष्ट्रांचा होकार असावा लागतो.यांपैकी एकाही राष्ट्राने संमती न दिल्यास निर्णय फेटाळला जातो.
कार्ये : जागतिक शांतता व सुरक्षिततेची जोपासना करणे, वादग्रस्त आंतरराष्ट्रीय प्रश्नांची चौकशी करणे, आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्याच्या दृष्टीने उपाय सुचवणे, गरज भासल्यास आक्रमक देशाविरुद्ध आर्थिक किंवा लष्करी कारवाई करणे इत्यादी कामे सुरक्षा परिषद पार पाडते.
2006 ते 2016 54 सदस्य संख्या
Country | Current representative | Current state representation | Former state representation |
---|---|---|---|
China | ली बाओडाँग | चीनचे जनतेचे प्रजासत्ताक (१९७१–आजपर्येंत) | चीनचे प्रजासत्ताक (१९४६–१९७१) |
France | गेरार्ड अराउड | फ्रान्स (१९५८–आजपर्येंत) | फ्रान्स (१९४६), चौथे फ्रेंच प्रजासत्ताक (१९४६-१९५८) |
Russia | विटली चुर्किन | रशिया (१९९२–आजपर्येंत) | सोव्हिएत संघ (१९४६-१९९१) |
United Kingdom | सर मार्क ल्याल ग्रांट | युनायटेड किंग्डम (१९४६–आजपर्येंत) | — |
United States | सुसान राईस | अमेरिकेची संयुक्त संस्थाने (१९४६–आजपर्येंत) | — |
खालील ५ स्थायी सदस्यांना नकाराधिकार आहेत.
- अमेरिका
- रशिया
- चीन
- फ्रान्स
- युनायटेड किंग्डम
सध्याचे अस्थायी सदस्य देश
|
|
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- jjh. "संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद - अधिकृत संकेतस्थळ" (अरबी, इंग्लिश, चिनी, फ्रेंच, रशियन, and स्पॅनिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- "संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद - पूर्वपीठिका" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- "संयुक्त राष्ट्रांतील लोकशाही: संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभा व सुरक्षा परिषद यांच्या कामकाजाविषयीचे दुवे" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)