Jump to content

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे समर्थक आणि विरोधक

fसंयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे आणि चळवळीचे श्रेय मागण्यात काहिशी अहमहिका झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे समर्थकांचे एक वर्गीकरण आग्रही आणि दुसरे नेमस्त. दुसरे वर्गीकरण साहित्यिक आणि राजकारणी, तर तिसरे संघटना आणि व्यक्ति.

अमराठी भाषिकराज्यांशी जोडले जाण्याची अस्वस्थता तत्कालीन मध्यप्रांत आणि बेरार प्रांतातील विदर्भीय नेत्यांनी सर्व प्रथम व्यक्त करण्यास सुरुवात केल्याचा वऱ्हाडातील नेत्यांचा दावा असतो. भाषावार प्रांतरचनेचे समर्थन केल्याचे श्रेय टिळक संप्रदायी मागतात.

१९१७ मधील 'थ्री डिव्हिजन्स ऑफ महाराष्ट्र' या लेखात मराठी लोक हे मुंबई, महाराष्ट्र, विदर्भ, हैदराबाद व गोवा येथे पसरले आहेत, त्या सर्वांचा मिळून महाराष्ट्र व्हायलाच पाहिजे असे प्रतिपादन श्री. विठ्ठल वामन ताम्हणकरांनी केले. श्री. जनार्दन विनायक ओक यांना या लेखाचे महत्त्व खूप पटले व त्यांनी त्यांच्या 'लोकशिक्षण'मधून याचा वेळोवेळी पाठपुरावा करावयास सुरुवात केली.

श्रेय नामावली

कॉ. डांगे आणि साथी एस. एम. जोशी या दोनही नेत्यांचा कॉ. एस. के. लिमये, लाल निशाण पक्षाचे कॉम्रेड यशवंत चव्हाण, आणि कॉ. दत्ता देशमुखया तिघांवरही पूर्ण विश्वास होता.

आग्रही

संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हे वाक्य झाला शब्दासोबतच अक्षर लावूनच म्हणत. गांधीवादी मार्गानेच पण आंदोलना्चा मार्ग स्वीकारणे यांनी पसंत केले.

  • विठ्ठल वामन ताम्हणकर (संयुक्त महाराष्ट्राची संकल्पना १९१७ )
  • जनार्दन विनायक ओक [( मृत्यू २२ एप्रील १९१८) लोकशिक्षणचे आणि गीर्वाण लघुकोशाचे संपादक मासिक (स्थापना १९१२) आणि लोकशिक्षणमाला या नावाची पुस्तकमाला] , [कांदबरी लेखक जनार्दन ओकांपेक्षा हे वेगळे असावेत ? ] यांनी लोकशिक्षण मालेतून ताम्हणकरांची संयुक्त महाराष्ट्राची संकल्पना उचलून धरली.
  • रामराव देशमुख (तत्कालीन मध्यप्रांतातून मराठी भाषक वऱ्हाड वेगळा काढण्याची आग्रही भूमीका)
  • संयुक्त महाराष्ट्र सभेचे प्रवर्तक : ०१. दा.वि.गोखले... बी.ए. एलएल. बी., पुणे ०२. ग.त्र्यं. माडखोलकर ... उपसंपादक, महाराष्ट्र, नागपूर ०३. शं.न. आगाशे.. कॉमनवेल्थ चीफ एजंट, नागपूर ०४. डॉ. शिवाजीराव पटवर्धन ... अमरावती ०५. श्री. शं.नवरे... संपादक, प्रभात, मुंबई ०६. दि.वा दिवेकर... एम.ए., पुणे ०७. रा.न.अभ्यंकर... बी.ए. एलएल.बी., पुणे ०८. पा.र. अंबिके.. संपादक, महाराष्ट्र परिचय, पुणे ०९. त्र्यं. वि. पर्वते .. उपसंपादक, बॉम्बे क्रॉनिकल, मुंबई १०. मा. दि. जोशी... संपादक, बलवंत, रत्‍नागिरी ११. सु.मे.बुटाला... बी.ए. एलएल. बी. वकील. महाड १२. ग. वि. पटवर्धन ... मुंबई (कार्यवाह)
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर
  • अण्णाभाऊ साठे
  • एम. एम. जोशी
  • कॉ श्रीपाद अमृत डांगे
  • केशवराव जेधे
  • भाई उद्धवराव पाटील
  • प्र. के.अत्रे
  • सेनापती बापट
  • एस. के. लिमये
  • दत्ता देशमुख

समर्थक संस्था

  • संयुक्त महाराष्ट्र सभा (प्रथम प्रस्तावित १९४०)
  • 'संयुक्त महाराष्ट्र समिती'

समर्थक नियतकालिके

नेमस्त

संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हे वाक्य झाला शब्दासोबतच अक्षर न लावता म्हणत. आंदोलनांचा मार्ग मान्य नव्हता .केंद्रीय नेत्यांचे मन वळवण्यावर अधिक भर द्यावा अशी भूमिका.

  • यशवंतराव चव्हाण
  • विनोबा भावे

विरोधी

  • पंडित जवाहरलाल नेहरू
  • मोरारजी देसाई
  • स.का.पाटील