Jump to content

संभाजी भिडे

संभाजी भिडे
जन्म संभाजी विनायक भिडे[]
निवासस्थान सांगली
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे भिडे गुरूजी
धर्महिंदू
संकेतस्थळ
https://www.shrishivpratishthan.com/
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक


संभाजी भिडे (जन्म : इ. स. १९३४)[][] हे महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख आहेत.[] ते आपल्या समर्थकांत 'भिडे गुरुजी' या नावाने प्रसिद्ध आहेत.[]

शिवप्रतिष्ठान ही संस्था स्थापन करण्याआधी भिडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते.[]

शिवप्रतिष्ठान संस्थचे विचार व कार्य

शिवप्रतिष्ठान ही राजनैतिक पक्षाशी संलग्न नसणारी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. तिचे भारतीय जनता पक्षाशी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले संबंध अनेकदा समोर येतात.[][][] प्रीती सोमपुरा यांच्याशी बोलताना भिडे यांनी हिंदू तत्त्वज्ञानाचा पाया “एकं सद् विप्रा बहुधा वदन्ति” आहे असे आपले मत मांडले.[१०]

ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रकरण

१८ जून २०१७ रोजी पुणे येथील डेक्कन जिमखाना भागामध्ये ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या वारकऱ्यांनी प्रवेश केल्याबरोबर संभाजी भिडे आणि त्यांच्या अनुयायांनी पालखीच्या मार्गामध्ये तलवारी आणि मशाली घेऊन प्रवेश केला. पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची त्यांची अपेक्षा असली तरीही वारकऱ्यांनी आणि पालखी व्यवस्थापनाने हा प्रकार दरवर्षी होत असल्याचे सांगत संभाजी भिडे आणि अनुयायांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.[११] ह्याच प्रकरणाबद्दल भिडे आणि त्यांचे १००० अनुयायांवर डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला गेला.[१२][१३]

कोरेगाव-भीमा प्रकरण

१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी आलेल्या जनतेवरील झालेल्या हल्ल्यात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचा अहवाल ह्या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या दहा अनुसूचित जातीचे सदस्य असलेल्या सत्यशोधन समितीने दिला होता. ह्या दंगलीपूर्वी संभाजी भिडे कोरेगावला सतत भेटी देत होते असेही अहवालात नमूद केले गेले आहे.[१४] प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर या हल्ल्याला जबाबदार असल्याचा आरोप करून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.[१५][१६]

संदर्भ

  1. ^ "संभाजी भिडेंबद्दल या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?". BBC News मराठी (इंग्रजी भाषेत). 2018. 2018-03-27 रोजी पाहिले.
  2. ^ "संभाजी भिडेंबद्दल या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?". BBC News मराठी (इंग्रजी भाषेत). 2018. 2018-03-27 रोजी पाहिले.
  3. ^ "संभाजी भिडे यांची उदय निरगुडकर यांनी घेतलेली मुलाखत". न्यूज18 लोकमत. ८ जानेवारी २०१८. 2019-01-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ मार्च २०१८ रोजी पाहिले.
  4. ^ Bhosle, Prince Pratap Sinh Serfoji Raje (2017-12-20). Contributions of Thanjavur Maratha Kings: 2nd Edition (with a Brief History of Chatrapathi Shivaji Maharaj,Dharmaveer Sambhaji Maharajah,Swami Samartha Ramdas, Cholas,Nayakas and Indian Classical Art-Bharatanatyam) (इंग्रजी भाषेत). Notion Press. ISBN 978-1-948230-95-7.
  5. ^ "गुरुजींची ओळख – सुवर्ण सिंहासन". suvarnasinhasan.com (इंग्रजी भाषेत). 2018-10-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-06-28 रोजी पाहिले.
  6. ^ https://www.bbc.com/marathi/amp/india-48720029
  7. ^ "Hindutva activist revered by Uddhav, Modi slams both". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-03-25 रोजी पाहिले.
  8. ^ "Who is this man with Narendra Modi?". Zee News (इंग्रजी भाषेत). 2015-12-15. 2018-03-25 रोजी पाहिले.
  9. ^ "Sambhaji Bhide: The 85-year-old inspirational public leader who is admired by PM Narendra Modi – NewsX". NewsX (इंग्रजी भाषेत). 2017-11-16. 2018-01-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-25 रोजी पाहिले.
  10. ^ "Sambhaji Bhide Guruji's Exclusive Interview-TV9". Best video clip, most viewed | ShowTodayTV.com (इंग्रजी भाषेत). 2018-01-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-25 रोजी पाहिले.
  11. ^ "पालखीत अडथळा; भिडे गुरुजींविरुद्ध गुन्हा -Maharashtra Times". Maharashtra Times. 2017-06-19. 2018-03-25 रोजी पाहिले.[permanent dead link]
  12. ^ "कोण आहेत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे | पुढारी". www.pudhari.news. 2018-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-25 रोजी पाहिले.
  13. ^ "Case against Sambhaji Bhide, followers for `obstructing' waari". https://www.outlookindia.com/. 2018-03-25 रोजी पाहिले. External link in |work= (सहाय्य)
  14. ^ "कोरेगाव भीमा दंगलीत भिडे, एकबोटेंचा हात - सत्यशोधन समिती". 24taas.com (इंग्रजी भाषेत). 2018-01-20. 2018-03-25 रोजी पाहिले.
  15. ^ "26 मार्च पर्यंत मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडेला अटक करा अन्यथा विधानसभेला घेराव – लोकपत्र". elokpatra.com (इंग्रजी भाषेत). 2018-03-27 रोजी पाहिले.[permanent dead link]
  16. ^ "संभाजी भिडेंच्या अटकेसाठी एल्गार (video) | पुढारी". www.pudhari.news (इंग्रजी भाषेत). 2018-03-27 रोजी पाहिले.[permanent dead link]