संभाजी पाटील निलंगेकर
संभाजीराव पाटील निलंगेकर | |
आमदार निलंगा विधानसभा संघ | |
कार्यकाळ २०१९ – विद्यमान | |
कामगार विकास, कौशल्य विकास विभाग, माजी सैनिक कल्याण आणि भूकंप पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य | |
कार्यकाळ ऑगस्ट २०१७ – सप्टेंबर २०१९ | |
आमदार निलंगा विधानसभा संघ | |
कार्यकाळ २०१४ – २०१९ | |
कार्यकाळ २००४ – २००९ | |
जन्म | २० जून १९७७ (निलंगा) |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पार्टी |
आई | श्रीमती रुपाताई दिलीपराव निलंगेकर पाटील |
वडील | दिलीपराव शिवाजीराव पाटील निलंगेकर |
पत्नी | सौ. प्रेरणा संभाजीराव पाटील निलंगेकर |
निवास | निलंगा |
धर्म | सनातन |
संकेतस्थळ | www |
संभाजीराव पाटील निलंगेकर (२० जून, १९७७ निलंगा - हयात) हे निलंगा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. बालपणीपासून वडिलांचे आणि आईचे जनसेवेचे कार्य जवळून अनुभवले आहे. निलंगेकर हे कमी वयामध्ये तिसऱ्यांदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या नेत्यांपैकी एक आहेत.
लोकनेतृत्व
संभाजीराव पाटील निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे आघाडीचे नेते आहेत. अगदी कमी वयात राजकारणात प्रवेश करून त्यांनी मराठवाड्यातील सगळ्यात तरुण आमदार (२७ व्या वर्षी) होण्याचा बहुमान मिळवला. त्यांना ई.स २००४ ते २००९ या कार्यकाळात निलंगा मतदारसंघाचे पहिल्यांदा आमदार होण्याची संधी मिळाली.
२०१७ मध्ये झालेल्या लातूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. २०२० मध्ये १० पैकी ७ पंचायत समित्यांवर भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चिती करून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष देखील बिनविरोध निवडून आणले. लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रभाव निर्माण करण्यात, तळागाळात रुजविण्यात आणि वाढवण्यात त्यांनी मोलाचा हातभार लावला.
निलंगा मतदार संघात तीन तालुके येतात त्यात देवणी, शिरूर-अनंतपाळ आणि निलंगा यांचा समावेश होतो. निलंगा तालुका हा सर्वात जास्त गावं आणि खेडी असलेला तालुका आहे. या सर्व ग्रामपंचायतीसमोर आलेल्या समस्या सोडविण्याचे कार्य करण्यातही त्यांचा पुढाकार असतो. त्यांना “शंभो” या आपलेपणाच्या नावाने ओळखले जाते.
कारकीर्द
मराठवाड्यात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. म्हणूनच तात्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून रेल्वे बगीचा कारखाना निलंगेकरांनी मंजूर करून घेतला. या कारखान्यात मेट्रोच्या वातानुकूलित बोगीही तयार केल्या जाणार आहेत. २८ फेब्रुवारी २०१८ ला रेल्वे मंत्रालयात करार होऊन ३१ मार्च २०१८ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते याचे भूमिपूजन संपन्न झाले. १५०.५४ हेक्ट रवर हा प्रकल्प उभा असून १२ ऑक्टोबर २०१८ रोजी रेल्वे बोगी कारखाना उभारणीच्या कामाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात वर्षाला २५० बोगींची निर्मिती तर दुसऱ्या टप्प्यात वर्षाला चारशे बोगींच्या निर्मितीचे उद्दिष्ट आहे.
जनतेतर्फे लातूरच्या पाणी प्रश्नासाठी सातत्याने संघर्ष करणारे लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक युवा लोकप्रिय लोकनेते अशी सार्थ ओळख. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मराठवाडा वॉटर ग्रीड आणि नदीजोड प्रकल्प मंजूर झाला. लातूर जिल्ह्यातील लोकप्रिय नेते असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली जलयुक्त शिवार हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. सर्वांगीण विकासाला पोषक ठरतील असे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांच्याकडून पुढाकार घेण्यात आला.
बळीराजाच्या न्यायासाठी ७२ तास अन्नत्याग आंदोलन !
ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झालेले होते. त्यावेळी निलंग्याचे आमदार म्हणून निलंगेकर यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याकरिता संपूर्ण लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत निलंगेकर यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलनाचा एल्गार केला. आंदोलनाची दिशा ठरली, त्याप्रमाणे ७२ शेतकरी संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासोबत ७२ तास अन्नत्याग आंदोलनाला बसले. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी छेडण्यात आलेल्या या आंदोलनाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासारख्या अनेक बड्या नेत्यांचा पाठिंबा लाभला. या आंदोलनात मुंडण आंदोलनासारखी अनेक उपआंदोलने सुरू होती. या आंदोलनात अनेक शेतकरी बांधवांना रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली. आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे १३ ऑक्टोबरला राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
हरित शिवछत्रपती प्रतिमा
लातूर जिल्ह्यामध्ये एका शेतात अतिशय कालात्मकरीतीने बियांची पेरणी करून तयार केलेली जगातील सर्वात मोठी छत्रपती शिवाजी महाराज यांची हरित प्रतिमा साकारण्यात आली. ठिबक सिंचन अथवा तत्सम आधुनिक सिंचन पद्धतीविषयी जागृती निर्माण करण्यासाठी, पर्यावरणाशी आत्मीयता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविला होता. कमीत कमी पाण्यात अधिकाधिक शेती कशी करता येऊ शकते याबद्दल जागृती निर्माण करण्यात आली. याचे विहंगम दृश्य लक्षवेधी ठरले.
सर्वात मोठ्या राष्ट्रध्वजाची स्थापना
लातूर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील सर्वाधिक मोठा राष्ट्रध्वज स्थापित करण्यात आला. राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेचे प्रतिक असलेल्या राष्ट्राध्वजाकडे आणि भव्यतेकडे दृष्टीक्षेप जाताच भारत देशाविषयी अभिमान स्मरतो, द्विगुणीत होतो.
इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान
लातूरला पाणीदार करण्यासाठी इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानांतर्गत पाण्यासाठी काम सुरू केले. चार वर्षात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बदल घडून आला. मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान हाती घेण्यात आले.
अंत्योदयाची संकल्पना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न
पंडित दीनदयाल उपाध्याय यांची संकल्पना पूर्ण करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने १५ जुलै २०१९ ते १५ ऑगस्ट २९१९ या दरम्यान 'पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान' राबविण्यात आले होते. या कालावधीमध्ये राज्यातील १ लाख ५० हजार ५९६ कुटुंबांना नव्याने शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.
दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप
'प्रत्येक दिव्यांग बांधवाचे सशक्तीकरण व्हावे' हे स्वप्न आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे तीर्थरूप स्व.दिलीपरावजी पाटील निलंगेकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पहिले होते. त्यासाठी त्यांनी कार्यही सुरू केले. त्यांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी माजी खासदार श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर (अक्का) यांनी "अक्का फाउंडेशन"च्या माध्यमातून आजवर अनेक दिव्यांग बांधवांना उभे करण्यासाठी कार्य केले आहे. या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी ३ डिसेंबर २०१७ पासून कार्य सुरू केले होते. एका विशेष पोर्टलच्या माध्यमातून जिल्हाभरातील दिव्यांग बांधवांची नोंदणी करून घेण्यात आली. केंद्राच्या सामाजिक न्याय मंत्रालय व जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने नोंदणी करण्यात आलेल्या ८,७९७ दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. यापूर्वी उत्तरप्रदेश मधील ६० जिल्ह्यांतील १२,००० दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले होते. मात्र केवळ एकट्या लातूर जिल्ह्यातील ८,७९७ दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप होणार असल्याने देशातील हा पहिलाच जिल्हा ठरणार आहे.
२०१४ ते २०१९ भरीव कामगिरी
- लातूर जिल्ह्यातील 10 लाख 45 हजार 875 शेतकऱ्यांना मिळालेल्या दुष्काळग्रस्त अनुदानाची रक्कम 675 कोटी 33 लाख
- गारपीट अनुदान - 4 लाख 12 हजार 665 जणांना 176 कोटी 11 लाख
- पीक विम्याचा लाभ मिळालेले शेतकरी - 2 लाख 6 हजार 939, रक्कम 4186 कोटी 51 लाख.
- ग्रामीण भागातील घरकुल योजनांचे लाभार्थी - 1 लाख 66 हजार 419, रक्कम 186 कोटी 76 लाख.
- शहरी भागातील घरकुल योजनांचे लाभार्थी - 1 हजार 462, रक्कम 41 कोटी
- शौचालय बांधकाम ग्रामीण भाग - 1 लाख 74 हजार 627, रक्कम 112 कोटी 19 लाख
- जलयुक्त शिवार योजना - 700 गावात 15 हजार 102 प्रकारची कामे, रक्कम 204 कोटी 47 लाख.
- राष्ट्रीय महामार्ग - 269 किलोमीटर, रक्कम 3006 कोटी.
- राज्य महामार्ग - 349 किलोमीटर, रक्कम 110 कोटी 56 लाख
- मुख्यमंत्री ग्रामसडक योजना - 443.11 किलोमीटर, रक्कम 188 कोटी 81 लाख.
- सिंचन विहिरी - 5789, रक्कम 146 कोटी 67 लाख
- मुद्रा योजना लाभार्थी - 59 हजार 600, कर्जवाटप 765 कोटी 11 लाख
- कामगारांना किट व अन्य अनुदान - लाभार्थी 52 हजार 544, रक्कम 26 कोटी 27 लाख
- मागेल त्याला शेततळे - 2315, रक्कम 9.80 कोटी.
- कृषी पंपांना वीज जोडणी - 1650, रक्कम 172 कोटी 81 लाख
- बचत गटांना मदत व प्रोत्साहन - 9 हजार 395 गट, रक्कम सात कोटी 84 लाख
- राष्ट्रीय आरोग्य योजनेअंतर्गत 11 कामे, रक्कम 31.50 कोटी
- धनेगाव बंधाऱ्यात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना मावेजा 51 कोटी 44 लाख.
- जिल्हा परिषद पाणीपुरवठा 25 योजना
- रक्कम 17 कोटी 78 लाख
- प्रधानमंत्री सिंचन योजना - 20 हजार 307 हेक्टोर क्षेत्राचा लाभ, रक्कम 54 कोटी 76 लाख
- जन आरोग्य योजना उपचार शस्त्रक्रिया 49 हजार 720 रुग्ण, रक्कम 205 कोटी 10 लाख
- सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल - 200 कोटी रुपये
- मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र - 138 कोटी रुपये मंजूर
- लातूर शहरासाठी प्रलंबित नाट्यगृहाचा कामाची सुरुवात - 25 कोटी रुपये
- लातूर शहरातील मुस्लिम बांधवांसाठी शादीखान्याच्या कामास सुरुवात
- लातूर विभागीय विज्ञान केंद्र यासाठी 12 एकर जागा मंजूर. इस्त्रोच्या सहकार्याने केंद्र उभारणार.
- जलसंधारण कामात जिल्ह्याचा देशात पहिला क्रमांक
- घनकचरा व्यवस्थापनात ड वर्ग महानगरपालिका गटात लातूर मनपा देशात पहिली.
- मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानात लातूर राज्यात प्रथम क्रमांकावर
मंत्रिपदाचा यशस्वी कार्यकाळ
त्यांची कार्यशैली आणि तळमळ बघून त्यांच्यावर कामगार विकासाची आणि कौशल्य विकास विभागाची जबाबदारी सोपवली गेली. संभाजीराव यांनी महाराष्ट्राचे कामगार विकास, कौशल्य विकास विभाग, माजी सैनिक कल्याण आणि भूकंप पुनर्वसन मंत्री म्हणून मोलाचे योगदान दिले.
- लातूर जिल्ह्याला पाणी पुरवठा विभागाकडून मागील पाच वर्षात 644 कोटी 52 लाख रुपयांचा निधी मिळाला.
- राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमात 2019-2020 या वर्षासाठी 290 गावे, वाड्या वस्त्यांवर 333 योजनांचा 359 कोटींचा आराखडा मंजूर केला गेला.
- औसा तालुक्यातील 49 योजनांसाठी 65 कोटी रुपयांचा निधी मिळाला.
- मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत 10 कोटींच्या नवीन योजना 13 गावांमध्ये सुरू झाल्या.
- प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 43 कोटी 06 लाख रुपये निधी मंजूर झाला. यामुळे 51 गावांतील 1 लाख 56 हजार लोकांना लाभ मिळणार आहे.
- औसा तालुक्यातील किल्लारीसह 30 गावांच्या योजनेसाठी 28 कोटी 58 लाखांचा निधी आणला.
- खरोसासह ६ गावांच्या योजनेसाठी 4 कोटी 35 लाख तर मातोळासह 10 गावांच्या योजनेसाठी 6 कोटी 19 लाख निधी उपलब्ध होत आहे.
- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मागील पाच वर्षांत लातूर जिल्ह्यात 1 लाख 90 हजार 242 शौचालयांचे बांधकाम करण्यात आले असून यासाठी 182 कोटी 56 लाख रुपये खर्च करण्यात आले.
- औसा शहरातील निम्न तेरणा (माकणी) प्रकल्पावरून 45 कोटी 20 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर रण्यात आली.
- निलंगा तालुक्यातील एकूण 40 योजनांसाठी 40 कोटी रुपयांचा निधी मिळाला.
- औसा तालुक्यातील 50 गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार.
- बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने वर्ष 2019 पर्यंत 16 लाख 10 हजार 619 इतकी देशातील विक्रमी कामगार नोंदणी करण्यात आली असून विविध 28 योजनांच्या माध्यमातून बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना लाभ देण्यात येत आहे. राज्यातील कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळत आहे.
- 2022 पर्यंत 4.5 कोटी युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य ठेवून रोजगार, स्वयंरोजगार व कौशल्य विकास संबंधी विविध सेवा देण्यासाठी महाकौशल्य पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.
- "कुशल महाराष्ट्र रोजगार युक्त महाराष्ट्र" या ध्येयपूर्तीसाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेनुसार 2015 ते 2019 दरम्यान एकूण 1 लाख 73 हजार 469 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले असून 1 लाख 69 हजार 685 प्रशिक्षणार्थींचे मूल्यमापन झाले आहे. त्यानुसार 65 हजार 274 जणांना रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त झाले आहेत.
- लातूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर 700हून अधिक बचत गटांना विकसित करण्यासाठी 50000 रोख रकमेची बक्षिसे देण्यात आली. तसेच जिल्हा स्तरावरील सर्वोत्कृष्ट 10 बचत गटांना प्रत्येकी 2 लाख रोख रकमेची बक्षिसे देण्यात आली.
- या व्यतिरिक्त लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यभार यशस्वीरीत्या सांभाळला. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया, स्किल इंडिया यासारख्या असंख्य योजनेच्या माध्यमातून ते नागरिकांच्या समस्या निवारण्याचं काम करत आहेत.
- 2014 मध्ये झालेल्या 13 व्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 76817 एवढी मते प्राप्त करून, त्यांनी आपला ठसा संपूर्ण निलंगा मतदारसंघात उमटवला. तर 2019 मध्ये त्यांना एकूण 97324 मते मिळाली. व 32131 ते मतांनी विजयी झाले. दुष्काळमुक्तीसाठी हाती घेतलेला लढा, आणि त्याला लोकांनी भरभरून दिलेला आशीर्वाद हाच निवडणुकीतील लक्षवेधक मुद्दा ठरला. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गावी जाऊन शेवटच्या नागरिकापर्यंत दुष्काळमुक्तीचा निर्धार पोहोचविला.
- आधुनिक युगातील लोकनेता कसा असेल तर संभाजी पाटील निलंगेकर हे नाव समोर येतेच. चारित्र्यवान, उच्चशिक्षित, संवेदनशील आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे जबाबदारी म्हणून पाहणारे नेतृत्व ही ओळख त्यांच्या अविश्रांत कार्याने सिद्ध होत आहे.
शैक्षणिक पार्श्वभूमी
- इंजिनिअरिंग : जवाहरलाल नेहरू इंजिनिअरींग कॉलेज, औरंगाबाद
- पायलट ट्रेनिंग : Flytech Aviation Academy, हैद्राबाद
- जॉब : पायलट, कोन्तेस एअरलाईन
व्यक्तिगत रुची, छंद
निलंगेकर हे अत्यंत अभ्यासू आणि उच्चशिक्षित असून व्यावसायिकरीत्या पायलट होते. विदेशी एअरलाईनसाठी पायलट म्हणून त्यांनी काम सुद्धा केलं आहे. विमान चालविण्याची आवड, विमान तंत्रज्ञान आणि संशोधन यातही त्यांची विशेष रुची आहे. साहसी खेळांची त्यांना आवड आहे. पॅराग्लायडिंग, डीप स्विमिंग यासोबतच फुटबॉल, क्रिकेट हे मैदानी खेळही ते खूप आवडीने खेळतात. वाचन आणि प्रेरणादायी सिनेमा हा देखील आवडीचा विषय आहे. साहित्य आणि कलाकृती यांचा मनोरंजनासोबतच जीवनावर सकारात्मक परिणाम व्हावा असे मत आणि साधारण याच धाटणीच्या कलाकृतींची आवड. नाविन्यपूर्ण आणि रचनात्मक कामाची आवड. त्यातूनच शेती, पाणी आणि पर्यावरण यासंदर्भात नाविन्यपूर्ण योजना घेऊन त्या यशस्वीरीत्या साकार केल्या.
पारिवारिक पार्श्वभूमी
- वडिल : दिलीपराव शिवाजीराव पाटील निलंगेकर (१८८५ - आमदार, निलंगा मतदारसंघ)
- आई : (जन्म १ जून १९५७) श्रीमती रूपाताई दिलीपराव निलंगेकर पाटील संभाजीरावांच राजकीय श्रद्धास्थान; ह्या त्यांच्या आई आहेत. २००४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत लातूर मतदार संघातून, मा. रूपाताई पाटील निलंगेकर खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. वृक्ष लागवड - हिरव्यागार आणि समृद्ध लातूरसाठी त्यांच्या मातोश्री आपल्या कार्यकाळातील सर्व पगारातुन एकही रुपया स्वतःसाठी खर्च न करता वृक्षलागवडीचे मोठे काम करीत तसेच आजही मिळणाऱ्या पेन्शनच्या सर्व पैशातून हे पवित्र कार्य चालू आहे, लातूरच्या पाणीप्रश्ना साठी त्यांनी मोठे कार्य केले आहे त्याच प्रमाणे, सामाजिक जागरूकता, पर्यावरणीय संवर्धन, शासकीय योजनांचा लाभ प्रत्येकाला मिळावा यासाठी अक्का फाऊंडेशनच्या माध्यमातून कार्य, सांस्कृतिक वारसांचे जतन आणि संवर्धन यासाठी त्यांनी कार्य केले आहे.
- भाऊ : अरविंद पाटील निलंगेकर हे लातूर विभागातील उदयोन्मुख नेते आहेत. उत्तम व्यवस्थापन कौशल्य, सर्वांना आकर्षित करणारे तरुण व्यक्तिमत्त्व. आपल्या कार्यातून स्थानिक नागरिकांच्या मनात मोठे महत्त्वाचे स्थान त्यांनी निर्माण केले आहे.
संदर्भ
- http://epaperlokmat.in/Archive/epapernew.php?articleid=LOK_HLTR_20191025_2_1&arted=Hello%20Latur&width=597px
- http://epaperlokmat.in/Archive/epapernew.php?articleid=LOK_HLTR_20191028_4_7&arted=Hello%20Latur&width=216px
- http://epaperlokmat.in/Archive/epapernew.php?articleid=LOK_HLTR_20191103_1_5&arted=Hello%20Latur&width=222px
- http://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel.aspx#currPage=3
- http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_HLTR_20201211_1_10
- http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_HLTR_20201211_1_9
- http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_HLTR_20201211_4_15
- http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_HLTR_20201211_4_14