संभल
संभल | |
उत्तर प्रदेशमधील शहर | |
संभल | |
देश | भारत |
राज्य | उत्तर प्रदेश |
जिल्हा | संभल |
समुद्रसपाटीपासुन उंची | ६६६ फूट (२०३ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | २,२०,८१३ |
अधिकृत भाषा | उर्दू |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ) |
संभल हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्याच्या संभल ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. संभल उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात दिल्लीच्या १६० किमी पूर्वेस स्थित आहे. २०११ साली संभलची लोकसंख्या सुमारे 2 लाख होती. या ठिकाणाचे नाव सत्ययुगात सत्यव्रत, त्रेतामध्ये महादगिरी, द्वापरमध्ये पिंगल आणि कलियुगात संभल असे आहे. हे प्राचीन शहर एके काळी महान सम्राट पृथ्वीराज चौहान यांची राजधानी देखील होते. बाबरच्या सेनापतींनी येथील अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली होती आणि जैन मूर्तींची विट्ंबना केली होती. यासाठी अनेक हिंदू आणि जैन यांनी आपले प्राण वेचले आहेत.
धर्मिक महत्त्व
संभल अथवा शंभल तहसील उत्तर प्रदेश येथील रहिवाशांचा असा विश्वास आहे की पौराणिक संभल हेच ते ठिकाण आहे जेथे, कलियुगमध्ये, भगवान विष्णू कल्की अवतारात पुनर्जन्म घेतील. आक्रमक क्रूर मुघल मीर हिंदू बेग याने येथील हरिहर मंदिर पाडले. इ.स. १५२८ मध्ये त्याने त्या जागेवर याच मंदिराचे साहित्य वापरून संभल जामा मशीद बांधली. मीर ने येथे हिंदूंचा छळ केला त्यांना मारून टाकले गेले होते. आता हे मंदिर परत उभारणीसाठी हिंदू लढा देत आहेत.