Jump to content

संबळ

संबळ हे एक चर्मवाद्य आहे.हे दोन सारख्या वाद्यांचे युग्म असे हे वाद्य असते.देवीच्या गोंधळात गोंधळी हे वाद्य वाजवितात.हे बहुदा खोड आरपार कोरून अथवा पितळ किंवा तांबे या धातुस त्याप्रमाणे आकार देऊन त्यावर चामड्याचे आवरण केलेले असते. यास काड्यांच्या सहाय्याने वाजविले जाते. त्या काड्यांचे टोकास इंग्रजी अक्षर 'S' सारखा आकार दिला असतो.दुसऱ्या टोकाकडे पकडुन व संबळवर या काड्यांने आघात करून ते वाजविले जाते.हे दोन्ही आपसात जोडलेले असतात.वरील चामड्यास आवश्यक ताण देण्यास यास सभोवताल तबल्यागत चामड्याची/दोरीची वादी असते. या वाद्यावर त्रिताल,केरवा,धुमाळी आदी ताल प्रकार वाजविल्या जाउ शकतात.यास विशिष्ट प्रकारच्या छडीने किंवा क्वचित हातानेही वाजविता येते.याच्या वादकाच्या उजवीकडच्या भागाचा आवाज हा षडजस्तरापर्यंत तर डाव्या भागाचा आवाज हा खर्जातील असतो. हे अवनद्ध(तोंड चामड्याने झाकलेले) प्रकारचे युग्म चर्मवाद्य आहे[][ चित्र हवे ]

या वाद्यास दोरी वा शेल्याने कंबरेस बांधतात.हे वाद्य गोंधळी उभे राहूनच वाजवितात.

संदर्भ

  1. ^ "लोकमत नागपूर- ई - पेपर- दिनांक ११-८-२०१३ - सीएनएक्स पुरवणी, पान क्र. ६". 2013-10-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-08-11 रोजी पाहिले.