Jump to content

संध्या नरे पवार

संध्या नरे पवार ही एक मराठी लेखिका असून तिने दलित स्त्रियांचे वर्तमान स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही कसे फार बदलले नाही याबद्दल पूर्ण महाराष्ट्र भर फिरून त्याबद्दल लिहिले आहे. त्यांनी आपले तिची भाकरी कोणी चोरली? बहुजन स्त्रीचं वर्तमान हे पुस्तक ३ भागात विभावले असून, प्रथम भागात दलित कामगार स्त्रियांचे जीवन आणि कामाची स्थिती याविषयी चर्चा केली आहे. पूर्वी दलित लोकांचे व्यवसाय हे त्यांच्या जातीवरून ठरविले जात असत. पण स्वातंत्र्यानंतर लोकांना त्यांच्या मतानुसार व्यवसाय निवडण्याचे स्वतंत्र मिळाले. पण अजूनही दलित स्त्रिया ह्या त्यांच्या पारंपरिक व्यवसायात गुंतून असलेल्या दिसून येतात व हे व्यवसाय त्यांच्यावर चालत आलेल्या जातीवादी समाजरचनेमुळे मिळालेले दिसून येतात. अशा व्यवसायात स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते.

दुसऱ्या भागात त्यांनी दलित स्त्रियांच्या शिक्षणाची वर्तमान स्थिती कशी आहे याबद्द्दल सांगितले आहे. त्या सांगतात दलित मुलींचा शिक्षणातून गळतीच दर जास्त आहे. त्यांनी प्रथम संस्थेने मुलींच्या गळती बद्दल जो रिपोर्ट प्रकाशित केला त्याला स्वताच्या पुस्तकात संदर्भित केले. त्या पुस्तकात सागितले आहे की जर १०० दलित मुलींनी इयत्ता पहिली मध्ये स्वतःचे नाव दाखल केले तर फक्त ४ ते ५ मुली उच्च शिक्षणापर्यत पोहचतात. बाकी मध्येच शिक्षण सोडून जातात. आणि ज्या मुली उच्च शिक्षणामध्ये पोहचतात त्या स्वतः फार भेदभाव सहन करतात.

पुरस्कार