संदेशवहन
संदेशवहन ही संदेशाच्या देवाण-घेवाणीसाठी वापरली जाणारी संज्ञा आहे.
संदेशवहनाची साधने
- टपालसेवा
- दूरचित्रवाणी
- नभोवाणी
- वृत्तपत्रे
- दूरध्वनी
- कृत्रिम उपग्रह
- भ्रमणध्वनी
संदेशवहन
आधुनिक संदेशवहन साधनांमुळे देशातील तसेच जगातील कोणत्याही ठिकाणी अल्पावधीत संपर्क साधणे शक्य झाले आहे. जगाच्या एखाद्या भागात घडणारी घटना काही क्षणांतच दूरचित्रवाणीच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहचते. आधुनिक संदेशवहनाच्या सोयींद्वारे लिखित, संभाषित तसेच दृश्यस्वरूपातील विचारांची देवाण-घेवाण होते. कृत्रिम उपग्रहाद्वारे संदेशवहन होत असल्याने या क्षेत्रात क्रांती घडून आली आहे.
टपाल
जगातील सर्वात मोठे टपाल सेवा जाळे भारतात आहे. पत्रे, पाकिटे, सामान, पैसे इत्यादी गोष्टी टपालमार्गे पोहोचवल्या जातात. कमी दिवसांत पत्रे पोचवण्यासाठी 'स्पीड पोस्ट' ही योजना मोठ्या शहरांत सुरू आहे. संगणकाच्या वापरामुळे ई-मेल ही सेवाही संदेशवहनासाठी उपलब्ध झाली आहे.
बाह्य दुवे
- "बॅरिअर्स टु इफेक्टिव्ह कम्युनिकेशन" (इंग्रजी भाषेत). 2011-12-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ७ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)