संदिपान भुमरे
संदिपान भुमरे हे एक भारतीय राजकारणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याचे आमदार आहे. मराठवाड्यातील शिवसेना नेते आहेत. ते रोजगार हमी आणि फलसंवर्धन मंत्रालयाचे मंत्री आहेत[१][२] ते 14 व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते शिवसेनेचे सदस्य म्हणून पैठण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते 1995, 1999, 2004, 2014 आणि 2019 मध्ये 5 वेळा विधानसभेवर निवडून आले होते.[३] आणि ते रेणुका देवी-शरद सहकारी साखर कारखाना, विहामांडवाचे चेरमन आहेत. तसेच त्यांनी संत एकनाथ सहकारी साखर कारखाना, पैठण येथे स्लिपबॉय म्हणून काम केले.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Maharashtra Cabinet portfolios announced".
- ^ "महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर".
- ^ "संग्रहित प्रत". 2015-11-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-07-06 रोजी पाहिले.