संतोष दानवे
संतोष रावसाहेब दानवे (जन्म १५ डिसेंबर १९८४) हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी, आणि भोकरदन मतदार संघामधील आमदार आहेत. ते १३व्या महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात तरुण सदस्य होते.[१][२] ते भारतीय जनता पक्षाचे आहेत.
प्रारंभिक जीवन
दानवे हे रावसाहेब दानवे यांचे पुत्र आहेत.[३] भोकरदन येथील मोरेश्वर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातून त्यांनी पदवी संपादन केली.
वैयक्तिक जीवन
दानवे यांनी मराठी संगीतकार राजेश सरकटे यांची मुलगी रेणू सरकटे यांच्याशी मार्च २०१७ मध्ये लग्न केले.[४]
संदर्भ
- ^ "Article" (PDF). ceo.maharashtra.gov.in. 2018-06-15 रोजी पाहिले.
- ^ "Bhokardan Election and Results 2018, Candidate list, Winner, Runner-up, Current MLA and Previous MLAs". www.elections.in. 2021-11-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-11-02 रोजी पाहिले.
- ^ "BJP's Maharashtra balancing act: Why Raosaheb Danve was made the party's new state chief - Firstpost". www.firstpost.com.
- ^ "Maharashtra BJP chief's son has opulent wedding with medieval-era palatial set, drone-cameras". The Asian Age. 3 March 2017.