संतोष घंटे
हार्मोनियम वादक | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑगस्ट ११, इ.स. १९८२ लातूर | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
| |||
संतोष घंटे (११ ऑगस्ट, १९८२:लातूर, महाराष्ट्र - ) हे भारतीय हार्मोनियम वादक, एकलवादक, अनेक प्रसिद्ध गायक आणि वादकांबरोबर साथ संगत करणारे वादक आणि संगीतकार आहेत .
जीवन
घंटे यांचा जन्म लातूरमधील निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांनी आपले शालेय शिक्षण लातूर आणि चिंचवड येथे पूर्ण केले व पुणे शहरातील गोडसे वाद्य विद्यालयात आपल्या संगीत शिक्षणास सुरुवात केली. संगीत क्षेत्रातील आपल्या कामाबरोबरच त्यांनी लोक कलाकारांच्या प्रश्नांना मुख्यप्रवाही माध्यमांद्वारे समोर आणण्याचे कामही ते सातत्याने करत असतात.[१]
कारकीर्द
ते पं. आप्पासाहेब जळगावकर यांचे शिष्य आहेत.[२] १० ते ३० सप्टेंबर २००६ दरम्यान त्यांनी शालेय मुलांसह अनेक कार्यशाळा केल्या, लातूर जिल्ह्यातील ५० शाळांना ते शिकवू शकले. शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी या कार्यशाळा होत्या.[३] घंटे यांनी 22 देशांमध्ये आपले कार्यक्रम केले आहेत.[४][५] वेगवेगळ्या प्रयोगांसह त्याने हार्मोनियम या वाद्याला साथ-सोबतच्या वाद्यापासून ते एकल वाद्य म्हणून वापरण्या पर्यंत आणले आहे.[६] लोकसंगीत लोकप्रिय करण्याचा आणि संगीताच्या दुर्लक्षित प्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.[७][८][९][१०] त्यांनी २०११ मध्ये सूरसाखा नावाने आपल्या गुरू आप्पासाहेब जळगांवकर यांना पुस्तकरूपाने श्रद्धांजली वाहिली.[११][१२][१३]
संवादिनी कला मंच
हार्मोनिअम लोकप्रिय करण्यासाठी त्यांने एक संस्था स्थापन केली आहे, या संस्थेच्या सहकार्याने त्यांनी कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे, मुलांना हार्मोनियमचे प्रशिक्षण दिले जात आहे.[१४][१५]
संदर्भ
- ^ "नाट्य, चित्रपट कलावंतांसमोर अडचणींचा डोंगर कायम". Dainik Prabhat (इंग्रजी भाषेत). 2020-09-29. 2020-10-09 रोजी पाहिले.
- ^ Suhasini, Lalitha; Jun 2, Pune Mirror | Updated:; 2019; Ist, 08:44. "On a solo trip: Musician from Pimpri- Chinchwad touring Italy, Germany and स्वित्झर्लंड to promote harmonium as a solo instrument". Pune Mirror (इंग्रजी भाषेत). 2020-08-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-02-27 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ "युवा कलाकाराची अनोखी संगीत यात्रा". Sakal Papers. 2006-10-20.
- ^ "विदेशामध्ये शास्त्रीय संगीताचा मोठा चाहता वर्ग". Dainik Prabhat (इंग्रजी भाषेत). 2019-11-02. 2020-02-27 रोजी पाहिले.
- ^ "संवादिनीचे सप्त सूर सातासमुद्रापार". Lokmat Paper. 2018-01-12.
- ^ "हार्मोनियमचा प्रसार हेच उद्दिष्ट". Maharashtra Times. 2019-09-14. 2020-02-27 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलन". www.lokmat.com. 2020-02-27 रोजी पाहिले.
- ^ "भारतीय संगीतास परदेशात उत्कट दाद - Marathi News | Indian musical fame abroad | Latest pune News at Lokmat.com". www.lokmat.com. 2020-02-27 रोजी पाहिले.
- ^ "सूर निरागस हो...ने रसिक मंत्रमुग्ध". Lokmat. 2016-03-09. 2020-02-27 रोजी पाहिले.
- ^ "सवाई महोत्सवातील स्वरानंद!". Lokmat. 2014-12-13. 2020-02-27 रोजी पाहिले.
- ^ "अभिजात संगीत जपण्याचा प्रयत्न". www.lokmat.com. 2020-02-27 रोजी पाहिले.
- ^ "'सूरसखा' चे आज सवाईमध्ये प्रकाशन". Maharashtra Times. 2020-06-17 रोजी पाहिले.
- ^ Santosh Ghante, Parmeshwar Kamle, (2011). Surasakha. Pune: Kshitij Prakashan, Pune.CS1 maint: extra punctuation (link)
- ^ "पिंपरीत संवादिनी कला मंचाची स्थापना". Sakal Papers. 2010-10-03.
- ^ Khan, Alifiya (2015-01-26). "Repaying His Guru's debt". Indian Express.