Jump to content

संताजी साहित्य संमेलन

संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीचे निमित्त साधून दिनांक ८-१२-२०१६ रोजी सुदुंबरे गावी पहिले संताजी साहित्य संमेलन झाले. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, संताजी महाराज जगनाडे संस्था, पालखी सोहळा मंडळ, स्नेही पुकार (नागपूर), सामाजिक बांधिलकी (पिंपरी-चिंचवड) आणि तेली समाज सेवक (नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन झाले. संताजी जगनाडे : चरित्र व अभंगांची चर्चा ( प्रकाशक : साक्षात प्रकाशन छत्रपती संभाजी नगर :प्रस्तावना : डॉ सतीष बडवे )या सुप्रसिद्ध संशोधनपर ग्रंथाचे लेखक व महाराष्ट्रातील सुपरिचित समीक्षक डॉ फुला बागूल ( शिरपूर जि धुळे ) हे या पहिल्या संताजी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते .

संताजी जगनाडे हे तुकाराम महाराजांचे लेखनिक होते. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथे त्यांची समाधी आहे.


पहा : साहित्य संमेलने