Jump to content

संजीवनी (कवी)

कवी संजीवनी तथा संजीवनी रामचंद्र मराठे (१४ फेब्रुवारी, इ.स. १९१६:पुणे, महाराष्ट्र - १ एप्रिल, इ.स. २०००:पुणे) या एक कवितागायनासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी कवयित्री होत्या.

संजीवनी मराठे यांचे शिक्षण पुण्यात झाले. शाळकरी वयातच त्यांनी कविता करावयास सुरुवात केली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या त्या जी.ए. (गृहीतागमा) व एम. ए. होत्या. आयुष्याच्या उत्तरार्धात संजीवनी मराठे आणि त्यांचे पती खानापूर-बेळगाव सोडून सांगलीस गेले. सांगलीत राममंदिराजवळच त्यांचा रामकृपा नावाचा बंगला होता. संजीवनीबाईंनी काही दिवस सांगलीच्या शाळेत शिक्षिकेचे काम केले.

संजीवनी मराठे यांना मिनी, भारती, अंजू या तीन मुली आणि प्रताप नावाचा मुलगा होता. प्रताप हा वैमानिक होता. अंजूने लग्नानंतर पाठविलेली पत्रे संजीवनी मराठे यांनी संपादित करून प्रकाशित केली.

कवितासंग्रह आणि अन्य साहित्य

  • अंजू (पत्रसंग्रह मूळ लेखिका - अंजू व्हॉन वेर्श (Anju Van Wersch)/संपादिका संजीवनी मराठे)
  • आत्मीय
  • इच्छामणी आणि इतर गोष्टी (बालसाहित्य)
  • काव्यसंजीवनी (१९४८)
  • गंमत (बालसाहित्य)
  • चंद्रफूल (१९५१)
  • चित्रा (१९४७)
  • छाया (१९४९)
  • ट्युलिप्सच्या देशातून (पत्रसंग्रह, मूळ लेखिका - अंजू व्हॉन वेर्श/ संपादिका संजीवनी मराठे)
  • परिमला (१९५९)
  • बरं का गं आई (१९६२- बालकवितासंग्रह)
  • भावपुष्प (१९५१)
  • मराठी साहित्य दर्शन (ललित लेख, भाग १ ते १०)
  • माझा भारत (बालसाहित्य)
  • माणिकमोती (बालकविता)
  • मासुमा आणि इतर प्राणिकथा (बालसाहित्य)
  • मी दिवाणी
  • राका (१९३८). या संग्रहात ’संजीवनी;तील काही निवडक कविता पुन्हा आल्या आहेत.
  • लाडकी लेक (१९७६) - अनुवादित बालकादंबरिका
  • वाळवंटातील वाट
  • संजीवनी (१९३२)
  • संजीवनी (१९७६). निवडक कवितांचा संपादित संग्रह
  • संसार (१९४३)
  • हसू बाई हसू (१९६३-बालकवितासंग्रह)

ध्वनिमुद्रित गीते

  • अंगाई राजस बाळा, ऐकत धुंदींत स्वप्नांचें संगीत, लागो रे डोळ्यासी डोळा
  • अंबरात नाजुकशी चंद्रकोर हासे
  • आला स्वप्‍नांचा मधुमास
  • आळविते मी तुला विठ्ठला
  • जिवाचा जिवलगा नंदलाला
  • या गडे हासू या
  • शांत सागरी कशास उठविलीस मला हे गाणं ऐकलं लामिळेल टकावादळे (गायिका कांचनमाला बढे)
  • सकल मिळुनि हसुनि
  • सत्यात नाहि आले
  • सोनियाचा पाळणा रेशमाचा
  • हसतिल मजला कबीर मीरा
  • अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता

पुरस्कार

महाराष्ट्र शासनाने ’बरं का गं आई’, आणि ’हसू बाई हसू’ या कवितासंग्रहांना पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.