Jump to content

संजय सूरकर

संजय भाऊराव सूरकर[] ( १९५९ - २७ सप्टेंबर, इ.स. २०१२) हे मराठी चित्रपट दिग्दर्शक व पटकथाकार होते. मराठी चित्रपटांसोबतच त्यांनी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका, तसेच हिंदी चित्रपटांचेही दिग्दर्शन केले. ’तू तिथं मी’च्या दिग्दर्शनासाठी संजय नूरकर यांना १९९८चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

बालपण

यांचे बालपण नागपूर येथे गेले. नागपूरच्या जी. एस. कॉलेजमधून त्यांनी बी.कॉम. ही पदवी घेतली. पण नाटकाची आवड असल्यामुळे नागपूर विद्यापीठातील ललित कला विभागात प्रवेश घेऊन मास्टर्सची डिग्री मिळवली. नागपुरामध्ये सुरुवातीच्या काळात एकांकिका व नाटके केली.

कारकीर्द

कारकिर्दीच्या सुरुवातीला ते गिरीश ओक यांच्या बरोबरीने मुंबईत आले. टीव्हीवरील मालिकांमध्ये संजय यांनो ' गावाकडच्या गोष्टी ' आणि तत्सम मालिकांसाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. कलाकार म्हणून त्याचवेळी ते ’सुयोग ' संस्थेच्या 'भ्रमाचा भोपळा' या व्यावसायिक नाटकातही काम करीत होते. 'वंश' हे नाटक त्यांनी व मंगेश कदमच्या यांनी मिळून राज्य नाट्य स्पर्धेसाठी, तर 'चाफा बोलेना' आणि 'प्रीतिसंगम' ही दोन नाटके व्यावसायिक रंगभूमीसाठी दिग्दर्शित केली. व्यावसायिक नाटके अपयशी ठरल्यानंतर संजय सूरकर चित्रपट आणि टीव्ही मालिकांकडे वळले. स्मिता तळवलकर यांच्या 'कळत नकळत' आणि 'सवत माझी लाडकी' या दोन चित्रपटांसाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केले. त्यांना चित्रपट दिग्दर्शनाची पहिली संधी स्मिता तळवलकरांनीच दिली.

वैयक्तिक जीवन

संजय सूरकर अविवाहित होते. त्यांच्या मागे तीन भाऊ आहेत.

नाटक

वर्ष (इ.स.)नाटकाचे नावभाषासहभाग
तू फक्त हो म्हणमराठीअभिनय
भ्रमाचा भोपळामराठीअभिनय
वंशमराठीदिग्दर्शन
चाफा बोलेनामराठीदिग्दर्शन
प्रीतिसंगममराठीदिग्दर्शन

चित्रपट

वर्ष (इ.स.)चित्रपटाचे नावभाषासहभाग
कळत नकळतमराठीसाहाय्यक दिग्दर्शन
सवत माझी लाडकीमराठीसाहाय्यक दिग्दर्शन
इ.स. १९९८तू तिथं मीमराठीदिग्दर्शन
इ.स. १९९३आपली माणसंमराठीदिग्दर्शन
इ.स.१९९४यज्ञमराठीदिग्दर्शन
इ.स. १९९१चौकट राजामराठीदिग्दर्शन
इ.स. १९९६रावसाहेबमराठीदिग्दर्शन
घराबाहेरमराठीदिग्दर्शन
इ.स. २००४सातच्या आत घरातमराठीदिग्दर्शन
इ.स. २००६आईशप्पथ..!मराठीदिग्दर्शन,
पटकथा
इ.स. २००६आनंदाचे झाडमराठीदिग्दर्शन
रानभूलमराठीदिग्दर्शन
सुखान्तमराठीदिग्दर्शन
इ.स. २००७सखीमराठीदिग्दर्शन
इ.स. २००७आव्हानमराठीदिग्दर्शन
इ.स. २००८एक डाव संसाराचामराठीदिग्दर्शन
इ.स. २००९मास्तर एके मास्तरमराठीदिग्दर्शन
इ.स. २०११स्टँडबायहिंदीदिग्दर्शन
इ.स. २००८तांदळामराठीदिग्दर्शन

दूरचित्रवाहिनी मालिका

वर्ष (इ.स.)मालिकेचे नावभाषासहभाग
राऊमराठीदिग्दर्शन
घरकुलमराठीदिग्दर्शन
इ.स. १९९८अवंतिकामराठीदिग्दर्शन
इ.स. १९९८ऊन-पाऊसमराठीदिग्दर्शन
इ.स. १९९८सुकन्यामराठीदिग्दर्शन
आपकी अंतराहिंदीदिग्दर्शन
ढूँढ लेगी मंजिल हमेंहिंदीदिग्दर्शन

मृत्यू

सूरकरांच्या लाठी या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यात चालू असताना २७ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी, चित्रपटातील दृश्यासंदर्भात अभिनेते सचिन खेडेकर यांच्याशी चर्चा सुरू असताना सूरकर यांना अस्वस्थ वाटू लागले आणि लगेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.[]. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात नेत असतानाच त्यांचे निधन झाले [] .

पुरस्कार

  • महाराष्ट्र सरकारचा १९९०सालचा उत्कृष्ट चित्रपटासाठीचा प्रथम पुरस्कार : चौकट राजा(चित्रपट)
  • महाराष्ट्र सरकारचा १९९५सालचा उत्कृष्ट चित्रपटासाठीचा प्रथम पुरस्कार : रावसाहेब(चित्रपट)
  • महाराष्ट्र सरकारचा १९९१सालचा उत्कृष्ट चित्रपटासाठीचा द्वितीय पुरस्कार : आपली माणसं(चित्रपट)
  • फिल्मफेर पुरस्कार-१९९८ (उत्कृष्ट दिग्दर्शन) : तू तिथं मी(चित्रपट)

संदर्भ व नोंदी

  1. ^ "संजय सूरकर".[permanent dead link]
  2. ^ "दिग्दर्शक संजय सूरकर यांचे निधन[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". २८ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)
  3. ^ "संजय सूरकर यांचे निधन". २८ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील संजय सूरकर चे पान (इंग्लिश मजकूर)