संजय राऊत
संजय राऊत (१५ नोव्हेंबर, १९६१ - ) हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. संजय राऊत यांनी २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांच्यावरील जीवनपट ठाकरे चे कथा लेखन देखील केले आहे.[१]
भूषवलेली पदे
अ. क्र. | पद | कालावधी | संदर्भ |
---|---|---|---|
१. | राज्यसभेचे सदस्य | २००४-२०१० | |
२. | राज्यसभेतील शिवसेनेचे नेते | २००४-२०१९ | |
३. | गृहविभाग समितीचे सदस्य नागरी विमान वाहतूक मंत्रालयासाठी सल्लागार समिती | २००५-२००९ | [२] |
४. | राज्यसभेचे सदस्य (दुसऱ्यांदा) | २०१०-२०१६ | |
५. | अन्न, ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण समितीचे सदस्य ऊर्जा मंत्रालयासाठी सदस्य सल्लागार समिती | २०१० | |
६. | राज्यसभेचे सदस्य (तिसऱ्यांदा) | २०१६-२०२२ | |
७. | राज्यसभेचे सदस्य (चौथ्यांदा) | २०२२-२०२९ | [३] |
- संसदीय समितीची नेमणूक
- १३ सप्टेंबर २०२१ नंतर: सदस्य, सल्लागार समिती, परराष्ट्र व्यवहार समिती.[४]
संदर्भ
- ^ "Thackeray: It is not easy to make film on Balasaheb, says Shiv Sena chief Uddhav- Firstpost". Firstpost (इंग्रजी भाषेत). 2018-08-25 रोजी पाहिले.
- ^ "संपर्क प्रशासकीय यंत्रणा – शिवसेना नेते, उपनेते, सचिव, प्रवक्ते - शिवसेना". 2015-09-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Rajya Sabha polls: 6 candidates from Maharashtra elected unopposed".
- ^ "Committee on External Affairs : Loksabha". loksabhaph.nic.in. 20 January 2022 रोजी पाहिले.