संजय उपाध्ये
संजय उपाध्ये (१६ मे, १९६९) हे एक मराठी लेखक आणि व्याख्याते आहेत. हे गप्पाष्टककार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आळंदी येथील विश्व शांती संघाचे संचालक म्हणून ते डॉ. विश्वनाथ कराड यांच्याबरोबर काम करतात. संजय उपाध्ये हे युनेस्कोचे सदस्य आहेत. 'मन करा रे प्रसन्न' या नावाची त्यांची 'जीवनाची कला' शिकवणारी व्याख्यानमाला आहे.
ते गप्पाष्टक नावाचा एक एकपात्री कार्यक्रम करतात.
पुस्तके
- ऐनवेळी (कथासंग्रह)
- गीत - भगवद्गीता (धार्मिक)
- वास्तव (कवितासंद्रह)
- विनायक विजय (चरित्र)
भाषणे
- इंडेमाऊची गाणी (बालसाहित्य)
- गप्पाष्टक भाग १,२
डॉ. संजय उपाध्ये यांच्या कवितेचा नमुना
- आईची मम्मी झाली, चवीची यम्मी झाली
- बदलाचे फॅड झालं, वडलांचं डॅड झालं
- पतंगाचं काईट झालं, विमानाचं फ्लाईट झालं
- कावळ्याचं क्रो झालं, भावाचं ब्रो झालं
- पोळीचं फ्रँकी झालं, रुमालाचं हँकी झालं
- भाताचं राईस झालं, छानचं नाईस झालं
- श्शीचं शिट झालं, सामानाचं किट झालं
- स्थानकाचं स्टेशन झालं, सत्राचं सेशन झालं
- शांतीचं पीस झालं, बहिणीचं मिस झालं
- प्रत्येक मोठं छोटं झालं, खऱ्याचंही खोटं झालं
- प्रत्येक क्षण झुरणं आलं, जगणंसुद्धा मरणं झालं
- यावरती पर्याय काही, नुसतं रडणं उपाय नाही
- एक उपाय आहे त्यावर, पहिलं तुझं रडणं आवर
- चोवीस तास प्रसन्न रहा, मग काय होईल ते पहा
- अरे तुझी भाषा बदलेल, मातृभाषेतच आशा जन्मेल.