Jump to content

संघराज्य पद्धत

काही देश आकाराने मोठे असतात व त्यात अनेक प्रदेश असतात.अशा देशांमध्ये एका शासनामार्फत संपूर्ण शासन चालवणे अवघड असते.म्हणून या देशांमध्ये शासव्यवस्था द्विस्तरीय असते. एक शासन राष्ट्रीय स्तरावर असते व दुसरे प्रादेशिक स्तरावर असते.या प्रदेशांना किंवा घटकांना राज्य अथवा प्रांत असे म्हणतात.सत्तेचे विभाजन या दोन शासनामध्ये केले जाते. केंद्रीय स्तरावरील शासनाला राष्ट्रीय शासन,केंद्रशासन,संघीय शासन किंवा संघराज्य शासन असेही म्हणले जाते.,तर प्रादेशिक स्तरावरील शासनाला राज्यशासन असे म्हणतात.ज्या देशात अशी द्विस्तरीय यंत्रणा असते त्यांना संघराज्य पद्धत किंवा संघराज्य व्यवस्था असे म्हणतात.