Jump to content

संघचारी टिटवी

संघचारी टिटवीचे चित्र
संघचारी टिटवी

संघचारी टिटवी किंवा सार्थवाहक टिटवी (इंग्लिश:sociable lapwing; हिंदी: संधी टिटिरी) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी मध्यम आकाराच्या गाव-तितीराएवडा असतो. डोके तपकिरी कपाळ पिवळट पांढरे असते. डोळ्यामागून निघालेला पांढरा पट्टा खाली माने पर्यंत जातो. डोळा आणि कानाला जोडणारी तपकिरी पट्टी असते. शेपटी आणि पाठीखालचा भाग पांढरा असतो. त्याची हनुवटी व गळा पांढरा शुभ्र असतो. छाती दुरकात करडी असत. आणि पाय काळे असतात.

वितरण

हे पक्षी हिवाळी पाहुणे असतात. पाकिस्तान, वायव्य भारत, उत्तर प्रदेश, उत्तर बिहार, दक्षिणेकडे राजस्थान, गुजरात आणि काही भटके पक्षी केरळ आणि श्रीलंकेत आढळतात .

निवासस्थाने

ते उजाड माळराने आणि शेतीचा प्रदेश या भागात आढळतात.

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली