Jump to content

संगणन वापरकर्ता

व्यक्तीचे चिन्ह सामान्यतः वापरकर्त्याचे प्रतिनिधित्व करते

वापरकर्ता एक अशी व्यक्ती आहे जी संगणक किंवा नेटवर्क सेवा वापरते. संगणक प्रणाली वापरकर्त्यांकडे आज्ञावली कसे कार्य करते याबद्दल सहसा अनुभव नसतो. []

स्वतःला ओळखण्यासाठी, वापरकर्त्याचे खाते (वापरकर्ता खाते) आणि वापरकर्तानाव (ज्याला स्क्रीन नाव, हँडल किंवा टोपणनाव देखील म्हणले जाते) असते आणि बऱ्याच प्रकरणांमध्ये परवलीचा शब्द देखील असतो.

वापरकर्ता खाते एखाद्यास सिस्टम सेवांमध्ये अधिप्रामाणिकृत करण्याची परवानगी देतो. हे खाते एखाद्यास सेवांमध्ये प्रवेश करण्याची आणि अधिकृत करण्याची संधी देखील प्रदान करते. तथापि, अधिप्रमाणनाचा अर्थ अधिकृतता होत नाही. एकदा वापरकर्त्याने लॉग इन केल्यानंतर, संचालन प्रणाली बहुतेकदा वापरकर्तानावाऐवजी पूर्णांकाचा अभिज्ञापक म्हणून वापर करेल.

हे सुद्धा पहा

  • नोंदणीकृत वापरकर्ता

संदर्भ

 

  1. ^ Jargon File entry for "User". November 7, 2010 रोजी पाहिले.