Jump to content

संख्यालेखन

संख्यालेखन ही संख्येचे विविध प्रकारे लेखन करण्याच्या पद्धती होय.

गणित विषयाची सुरुवात संख्या मोजण्यापासून होते. १,२,३,४ याप्रमाणे संख्या मोजल्या, तरी त्या लिहिण्याचे काम अनेक संस्कृतींच्या मध्ये वेगवेगळे झालेले दिसते. उदाहरणार्थ रोमन पद्धतीत I हे अक्षर १ साठी , X हे अक्षर दहासाठी असे नियम होते. V हे अक्षर ५ साठी तर ४ साठी IV, ६ साठी VI असे लिहिले जाई. मोठ्या किमतीच्या अक्षरानंतर लहान किमतीचे अक्षर म्हणजे त्यांची बेरीज, मोठ्या किमतीच्या अक्षराच्या आधी लहान किमतीचे अक्षर म्हणजे लहान अक्षराने केलेली वजाबाकी असे संकेत होते. मोठ्या संख्यांच्या साठी नवनवी अक्षरे लागत होती. या सगळ्यांपेक्षा भारतीय लोकांनी शोधलेली शून्यासह दशमान पद्धत खूप सुलभ असल्यामुळे सर्व जगात ती स्वीकारली गेली.