Jump to content

स.ग. जोशी

सखाराम गणेश जोशी (जन्म : इ.स. १८८०; - इ.स. १९३५) हे इतिहास संशोधक होते. ते पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे कार्यरत होते. स.ग.जोशी यांचा जन्म इ.स.१८८० साली झाला. ते मूळचे मालवणचे होते. १९१८ साली ते मंडळाचे सभासद झाले व इतिहास संशोधन करू लागले. तत्कालीन भोर संस्थानात व मावळ भागात हिंडून त्यांनी शेकडो ऐतिहासिक कागदपत्रे व वस्तू मंडळासाठी जमवल्या. मावळातील अनेक वतनदार घराण्यांच्या वंशावळी त्यानी तयार केल्या. अनेक कागदपत्रे व लेख त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकात प्रसिद्ध केले.

त्यांचे वयाच्या ५५व्या वर्षी इ.स.१९३५ साली निधन झाले.