षड्रस म्हणजे सहा प्रकारचे रस (चवी). यात गोड, तिखट, आंबट, खारट, तुरट व कडू अशा सहा चवींचा समावेश होतो. जेवणात षड्रसपुर्ण आहाराचा समावेश असावा असे आयुर्वेद सांगते. याने शरीरास सर्व प्रकारच्या जीवनसत्त्वांचा पुरवठा होतो. कोणताही खाद्यपदार्थ हा षड्रसपुर्ण असला पाहिजे असा पुर्वी दंडक होता.