Jump to content

षड्दर्शने

षड्दर्शने यांची निर्मिती विश्वातील परमात्मा, प्रकृती, पुरुष, सृष्टी, आत्मा व मोक्ष या मूलभूत तत्त्वांचे रहस्य जाणून घेण्याच्या जिज्ञासेतून झाली. या षड्दर्शनात भारतीय आध्यात्मिक तत्त्वज्ञान सांगितलेले आहे. षड्दर्शने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दर्शनात फक्त वैदिक दर्शनाचा समावेश आहे. या षड्दर्शनांची निर्मिती इ.स.पू. ८०० ते इ.स.पू. २०० या कालखंडात झालेली आहे. सांख्य दर्शन, योग दर्शन, न्याय दर्शन, वैशेषिक दर्शन, पूर्वमीमांसा दर्शन व वेदांत दर्शन ही षड्दर्शने आहेत.

कपिलाचे सांख्य दर्शन

पतंजलीचे योग दर्शन

गौतमाचे न्याय दर्शन

कणादाचे वैशेषिक दर्शन

पूर्वमीमांसा दर्शन

वेदांत दर्शन