Jump to content

श्र्यॉडिंगरचे मांजर

श्र्यॉडिंगरचे मांजर हा ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ एर्विन श्र्यॉडिंगर यांनी १९३५ साली रचलेला एक मानसप्रयोग आहे. याची गणना भौतिकी कूटप्रश्नांमध्येही केली जाते. पुंजभौतिकीच्या कोपनहेगन विचारधारेचा सामान्य वस्तूंवर प्रयोग करण्यातील अडचण हा मानसप्रयोग स्पष्ट करतो. या मानसप्रयोगात एका मांजराची कल्पना केलेली आहे, ज्याचे आयुष्य एका अशा घटनेवर अवलंबून आहे, जी घडलेली असूनही जिचे फलित अनिश्चित आहे. हा मानसप्रयोग कल्पिताना श्र्यॉडिंगरने वेर्श्च्रेंकुंग म्हणजेच गुंतागुंत या पारिभाषिक शब्दाची निर्मिती केली.

Schrödinger's cat: a cat, a flask of poison, and a radioactive source are placed in a sealed box. If an internal monitor detects radioactivity (i.e. a single atom decaying), the flask is shattered, releasing the poison that kills the cat. The Copenhagen interpretation of quantum mechanics implies that after a while, the cat is simultaneously alive and dead. Yet, when one looks in the box, one sees the cat either alive or dead, not both alive and dead. This poses the question of when exactly quantum superposition ends and reality collapses into one possibility or the other.